विजेच्या खांबावर कसे चढायचे? अळकुटीच्या विद्यार्थ्यांनी बनवले खास उपकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 07:15 PM2017-11-28T19:15:33+5:302017-11-28T19:19:24+5:30

विजेच्या खांबावर चढण्यासाठी वायरमनला आपला जीव धोक्यात घालून चढावे लागते. मात्र या वायरमन लोकांचा त्रास कमी करण्यासाठी पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी विजेच्या खांबावर चढण्याचे सोपे उपकरण बनवले आहे.

How to raise the electricity pole? Special equipment made by alkuti's students | विजेच्या खांबावर कसे चढायचे? अळकुटीच्या विद्यार्थ्यांनी बनवले खास उपकरण

विजेच्या खांबावर कसे चढायचे? अळकुटीच्या विद्यार्थ्यांनी बनवले खास उपकरण

googlenewsNext

विनोद गोळे
पारनेर : विजेच्या खांबावर चढण्यासाठी वायरमनला आपला जीव धोक्यात घालून चढावे लागते. मात्र या वायरमन लोकांचा त्रास कमी करण्यासाठी पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी विजेच्या खांबावर चढण्याचे सोपे उपकरण बनवले आहे.
पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पारनेर तालुका गणित-विज्ञान प्रदर्शन सुरू आहे. मंगळवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रदर्शन पाहत असताना अळकुटी येथील साईनाथ विद्यालयातील नववीमध्ये शिक्षण घेणारा सुहास गोरडे व दहावीतील अनिल कापसे यांनी एक अफलातून उपकरण बनवल्याचे दिसून आले. विजेची समस्या निर्माण झाल्यास विजेच्या खांबावर चढण्यासाठी वायरमन लोकांना आपला जीव धोक्यात घालून जावे लागते. यासाठी चांगले उपकरण म्हणून सुहास गोरडे व अनिल कापसे यांनी खांबावर चढण्याचे उपकरण बनवले आहे. आमदार विजय औटी, सभापती राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, प्राचार्य मुकुंद जासुद यांच्यासह शिक्षणाधिकारी संभाजी झावरे, प्रवीण ठुबे यांनी उपकरण पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

असे बनवले उपकरण

सुहास व अनिल यांनी एका ठिकाणी चपलाच्या साह्याने माणूस खांबावर चढत असल्याचे पाहिले होते. त्यात लोखंडी सळ्यांचा वापर असल्याचे त्यांच्या लक्षात आहे. त्यांनी जाड लोखंडी सळ्या घेतल्या. सिमेंट खांबांचे आकारमानाप्रमाणे चौकोनी कड्या बनवल्या. त्यांच्या मापाप्रमाणे त्या खांबात घट्ट बसतात. त्या चौकोनी उपकरणातून विजेचा करंट बसू नये म्हणून चप्पल ठेवायची. त्यात पाय ठेवल्यास ते चौकोनी उपकरण आपल्याला खांबावर चढण्यास मदत करतेच. शिवाय खांबावर बसून आपण कामही चांगल्या पध्दतीने करू शकतो़, असे दिसून येत आहे.

Web Title: How to raise the electricity pole? Special equipment made by alkuti's students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.