निंबोडीच्या जखमींसाठी एकवटले मदतीचे हात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:40 PM2017-08-31T12:40:48+5:302017-08-31T12:43:13+5:30

नगर तालुक्यातील निंबोडी गावातील शाळेची इमारत कोसळून दुर्दवी घटना घडली. यामध्ये तीन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला तर इतर विद्यार्थी जखमी झाले. या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी तसेच जिल्ह्यातील  शिक्षक वर्ग एकत्रित आला.

The hands of united support for the wounds of Nimbadi | निंबोडीच्या जखमींसाठी एकवटले मदतीचे हात 

निंबोडीच्या जखमींसाठी एकवटले मदतीचे हात 

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकारी व शिक्षकांनी दिली मदत  तब्बल दीड लाखांची मदत जमा 

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी गावातील शाळेची इमारत कोसळून दुर्दवी घटना घडली. यामध्ये तीन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला तर इतर विद्यार्थी जखमी झाले. या विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी तसेच जिल्ह्यातील  शिक्षक वर्ग एकत्रित आला. सोशल मिडीयाच्या माध्यमातून जखमींच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले. या माध्यमातून मदतीचे हात बळकट होत आतापर्यत तब्बल दीड लाख रुपयांची मदत जमा झाली आहे. 


घटना घडल्यानंतर दुस-या दिवशी व्हॉटस अ‍ॅप ग्रुप खोलण्यात आला. या माध्यमातून निंबोडी घटनेतील जखमी विद्यार्थ्यासााठी तातडीने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. नगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रामदास हराळ यांच्याकडे मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी व जिल्ह्यातील शिक्षकांनी मदतीचे हात पुढे केले. पुण्यातील शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, सुनंदा ठुबे, पांडुरंग मगर, अरु़ण धामणे, गटशिक्षणाधिकारी रामदास हराळ, थोरे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत केली आहे. तसेच शहरातील लोकमान्य टीळक मित्र मंडळानेही मदतीचा हात पुढे केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी हात पुढे केले आहेत. आतापर्यत १ लाख ६० हजार रुपयांची मदत जमा झाली होती. आणखीही मदतीचे हात सुरुच आहेत. 

Web Title: The hands of united support for the wounds of Nimbadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.