नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणणार : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 06:05 PM2017-12-20T18:05:45+5:302017-12-20T18:06:32+5:30

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केले. केंद्र सरकारकडे हे नियोजन पाठविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

In the Godavari area, 50 T M. C. water To bring: Devendra Fadnavis | नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणणार : देवेंद्र फडणवीस

नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणणार : देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

लोणी (अहमदनगर) : गोदावरी खोरे राज्यातील सगळ्यात मोठे खोरे आहे. या खो-याचे आपण नियोजन पूर्ण केले आहे. त्यासाठी दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व बाबी आम्ही या जलआराखड्यात समाविष्ट केल्या आहेत. हा जल आराखडा तयार करताना त्यांच्या सर्व सुचनांची व सगळ्या बाबींची काळजी घेऊन तो आराखडा राज्य सरकारने मंजूर केला. पश्चिमी वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या गोदावरी खो-यात आणण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली.
दिवंगत बाळासाहेब विखे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त लोणी (ता. राहाता) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, २९ उपखो-यांचा समावेश असलेल्या सर्वात मोठ्या गोदावरी खो-याचा संपूर्ण जलआराखडा राज्य सरकारने मंजूर केला आहे. एवढा मोठा जलआराखडा मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी तुटीच्या गोदावरी खो-यात आणून या भागातील जलसंकट दूर करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. पाण्याच्या तुटीमुळे उत्तर महाराष्ट्र विरुध्द मराठवाडा असा जलसंघर्ष पहायला मिळाला. दोन दोन जिह्यातील जलसंघर्ष पहायला मिळाला. हे वाईट चित्र व संघर्ष बदलण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केले. केंद्र सरकारकडे हे नियोजन पाठविण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यास तत्वत: मान्यता दिली आहे. बाळासाहेबांच्या स्वप्नातील जलक्रांतीचे जे नियोजन होते, ते आपण प्रत्यक्षात आणू शकलो, तर तीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल. त्यांच्या स्वप्नातील जलक्रांतीचे नियोजन पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील व प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकरी जलनियोजनातून समृध्द होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जि.प. अध्यक्षा शालिनी विखे, आमदार शिवाजी कर्डिले, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: In the Godavari area, 50 T M. C. water To bring: Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.