पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित 

By सुदाम देशमुख | Published: February 24, 2024 09:39 AM2024-02-24T09:39:20+5:302024-02-24T09:39:45+5:30

राम शिंदे यांनी दिला होता उपोषणाचा इशारा, पाणी असतानाही कुकडीतून पाणी न सोडल्याने देशमुख यांनी शेतकऱ्यांना धरले होते वेठीस 

Executive Engineer of Irrigation Department Kiran Deshmukh suspended | पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित 

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित 

अहमदनगर : 12 फेब्रुवारी 2024 रोजी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई बाबत आढावा बैठकीत कार्यकारी अभियंता किरण देशमुख हे लोकप्रतिनिधींना वस्तुस्थितीदर्शक माहिती अवगत करू शकेल नाहीत. त्यामुळे योग्य समन्वय न झाल्याने त्यांच्या निलंबनाची मागणी आमदार राम शिंदे यांनी केली होती. याबाबत त्यांनी उपोषणाचाही इशारा दिला होता. त्यावरून आज महाराष्ट्र शासनाचे सहसचिव डॉक्टर सुधीर गायकवाड यांनी एका आदेशद्वारे किरण देशमुख यांना निलंबित केले आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1969 चे नियम अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून देशमुख यांना शासन सेवेतून तात्काळ निलंबित करीत असल्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत. किरण देशमुख कार्यकारी अभियंता यांचे मुख्यालय अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ पुणे राहील, तसेच त्यांना अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ पुणे यांच्या पूर्वपरवानगी सेवा मुख्यालय सोडता येणार नाही,असे आदेशात म्हटले आहे.

दि. १२/२/२०२४ रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टंचाई बैठकीमध्ये सीना डॅम , निमगाव गांगर्डा (ता.कर्जत) मधून आवर्तन सोडण्याबाबत कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी पाणी असुन देखील आवर्तन सोडण्यास विलंब केला व शेतकऱ्यांना वेठीस धरले म्हणून पालकमंत्री यांनी आजच्या आज निलंबनाची व शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच निमगाव गांगर्डा येथील तलाठी कार्यालय बांधकाम परवानगी दोन वर्षांपासून प्रलंबित ठेवण्या-या संबंधित आधिकारयावर दफ्तर दिरंगाई अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

परंतु कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने  २०/२/२०२४ रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला याचा इशारा आमदार राम शिंदे यांनी दिला होता. दि.२०/२/२४ रोजी मुंबई येथे मराठा आरक्षण विधेयक बाबत विशेष अधिवेशन बोलावले असल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले होते दरम्यान शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Executive Engineer of Irrigation Department Kiran Deshmukh suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.