पोटच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न फसला : श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:47 PM2018-08-07T12:47:31+5:302018-08-07T12:47:45+5:30

तालुक्यातील पिसोरेखांड येथील एका नराधम पित्याचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीला दोन लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला.

Efforts to sell stomach's daughter are unsuccessful: Types of Shrigonda taluka | पोटच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न फसला : श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार

पोटच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न फसला : श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार

Next

श्रीगोंदा : तालुक्यातील पिसोरेखांड येथील एका नराधम पित्याचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीला दोन लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. अल्पवयीन मुलीचे दोन लाख रुपये घेऊन एका वयोवृद्ध माणसाशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न या नराधम पित्याने केला होता. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पित्यास अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, या नराधमास दोन बायका आहेत. इयत्ता नववीत शिकणा-या स्वत:च्या मुलीला हा सातत्याने त्रास देत होता. याबाबत मुलीने आईसह नातेवाईकांना कल्पना दिली पण कोणीच दखल घेतली नाही. त्यानंतर दोन लाख घेऊन या मुलीचा विवाह परस्पर कर्जत तालुक्यातील एका वयोवृद्धाशी निश्चित केला. वृध्द नवरदेवाने पत्रिकाही छापायला टाकल्या होत्या. मुलीने मुंबई येथील एका सामाजिक संस्थेकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत नराधम पित्याला बेड्या ठोकल्या. या आरोपीन केलेल्या कृत्याची कबुली दिली असून लग्न ठरलेल्या वृध्दाचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.

Web Title: Efforts to sell stomach's daughter are unsuccessful: Types of Shrigonda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.