डल्ला मारणा-यांचे ‘हल्लाबोल’ नाटक कशासाठी?  ; बबनराव पाचपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:41 PM2018-02-12T13:41:26+5:302018-02-12T13:42:22+5:30

श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री जर मोठ्या प्रमाणात निधी देत आहेत. तर मग त्यांच्याविरोधात डल्ला मारणारांचे हल्लाबोलचे नाटक कशासाठी? असा टोला माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी मारला आहे.

Dulla ki ke baat hain 'attackball' play for why? ; Babanrao Panchpatay | डल्ला मारणा-यांचे ‘हल्लाबोल’ नाटक कशासाठी?  ; बबनराव पाचपुते

डल्ला मारणा-यांचे ‘हल्लाबोल’ नाटक कशासाठी?  ; बबनराव पाचपुते

Next

श्रीगोंदा : तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री जर मोठ्या प्रमाणात निधी देत आहेत. तर मग त्यांच्याविरोधात डल्ला मारणारांचे हल्लाबोलचे नाटक कशासाठी? असा टोला माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी मारला आहे.
पाचपुते पुढे म्हणाले, तालुक्यातील विविध रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी मिळविण्यासाठी आपण प्रयत्न केले पण बोलबाला केला नाही. मात्र त्या रस्त्याला मंजुरी मिळाली की, आमदारांनी प्रसिद्धी पत्रक काढून आपणच या रस्त्यासाठी निधी आणल्याचा कांगावा सुरू केला आहे. नगर तालुक्यातील बारदरीच्या रस्त्यासाठी सुधीर पोटे यांच्या मागणीवरून आपण मुख्यमंत्र्यांना भेटून निधी मिळविला, पण हे लोकप्रतिनिधी सांगतात, तालुक्यातील रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत हे हास्यास्पद आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतक-यांना जवळपास ५०० कोटींपेक्षा जास्त पैसे मिळालेले आहे. बहुतेक याचे देखील श्रेय त्यांनीच घ्यावे, असा चिमटा पाचपुते यांनी आ. राहुल जगताप यांना घेतला.

Web Title: Dulla ki ke baat hain 'attackball' play for why? ; Babanrao Panchpatay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.