श्रीगोंद्यात मिठाईचे पैसे मागितल्यामुळे मिठाई दुकानाचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:24 PM2018-02-12T13:24:54+5:302018-02-12T13:26:03+5:30

श्रीगोंद्यात विजमंडळाच्या उपभियंत्याला मिठाईचे पैसे मागितल्याचा राग धरून मिठाई दुकानदाराच्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे या मिठाई मालकाचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे, अशी तक्रार तुलसीदास चौधरी यांनी श्रीगोंदा पोलिसांकडे दाखल केली आहे.

 Due to the demand of sweet money in Sriganda, the supply of sweet shops is broken | श्रीगोंद्यात मिठाईचे पैसे मागितल्यामुळे मिठाई दुकानाचा वीजपुरवठा खंडित

श्रीगोंद्यात मिठाईचे पैसे मागितल्यामुळे मिठाई दुकानाचा वीजपुरवठा खंडित

googlenewsNext

श्रीगोंदा : श्रीगोंद्यात विजमंडळाच्या उपभियंत्याला मिठाईचे पैसे मागितल्याचा राग धरून मिठाई दुकानदाराच्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे या मिठाई मालकाचे ७० हजाराचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी व संबंधित उपअभियंत्यावर कारवाई करावी, अशी तक्रार तुलसीदास चौधरी यांनी श्रीगोंदा पोलिसांकडे दाखल केली आहे.
श्रीगोंदा शहरातील तुलसी स्वीटहोममध्ये उपअभियंता चौगुले यांनी मिठाई घेतली असता दुकानदाराचे चालक तुलसीदास चौधरी यांनी त्याचे पैसे मागितले. यावेळी उपअभियंत्याने मी विजमंडळात अधिकारी असून मी पैसे देणार नाही असे सांगून तुझ्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित करतो असे म्हणून ते निघून गेले आणि दुसºया दिवशी त्यांनी दोन कर्मचारी पाठवून या तुलसी स्वीटहोम दुकानाचे वीजमीटर काढून नेले व त्याची तोडफोड करून तो नादुरुस्त करून दुसरे वजीमिटर बसवून वाढवा युनिटचे बिल देऊन ते भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी त्यांनी दुकांनदारास दिली. उपअभियंता चौगुले यांच्या सांगण्यावरून या मिठाईच्या दुकानाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे या दुकांनदाराचे ७० हजाराचे नुकसान झाले असून त्याची भरपाई मिळावी व सदर उपअभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी तुलसी स्वीटहोमचे मालक तुलसीराम गंगाराम चौधरी यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

मला शासनाचा पगार मिळतो

मला शासनाचा पगार मिळतो. त्यामुळे कुणाला पैसे मागण्याचे कारण नाही. स्वीट होममध्ये मीटरचा डिस्प्ले दिसत नव्हते म्हणून मीटर काढून नेले. मात्र त्यांनी माझ्या विरोधात खोटी फिर्याद दिली. त्या व्यक्तीच्या विरोधात मीटरमध्ये फेरफार करून चोरून वीज वापरली अशी तक्रार देणार आहे, अशी माहिती उपअभियंता चौगुले यांनी दिली.

Web Title:  Due to the demand of sweet money in Sriganda, the supply of sweet shops is broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.