कुत्र्यांचा सुळसुळाट; लसींचा तुटवडा

By मिलिंदकुमार साळवे | Published: July 14, 2018 11:48 AM2018-07-14T11:48:08+5:302018-07-14T11:49:22+5:30

राज्यभरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. धुमाकूळ घालणारी कुत्री चावत आहेत. कुत्रे चावल्यानंतर श्वानदंश प्रतिबंधक लस घ्यावी लागते.

Dogs Scarcity of vaccines | कुत्र्यांचा सुळसुळाट; लसींचा तुटवडा

कुत्र्यांचा सुळसुळाट; लसींचा तुटवडा

Next

मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : राज्यभरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. धुमाकूळ घालणारी कुत्री चावत आहेत. कुत्रे चावल्यानंतर श्वानदंश प्रतिबंधक लस घ्यावी लागते. पण, या लशींचे उत्पादन करणाऱ्या पुणे येथील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेकडून या ‘रेबिज’च्या लशींचा कमी प्रमाणात पुरवठा होत असल्यामुळे अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे.
नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गुरूवारी विधान परिषदेत अहमदनगर जिल्ह्यातील कुत्र्यांचा तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याबाबत आमदार डॉ. सुधीर तांबे, संजय दत्त, शरद रणपिसे, हुस्नबानू खलिफे यांनी हा प्रश्न विचारला होता.
अहमदनगर जिल्ह्यातील एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या वर्षभराच्या कालावधीत ४० हजार २८८ श्वानदंश केलेल्या रूग्णांना जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल २०१८ च्या श्वानदंश रूग्णांच्या आकडेवारीवरून अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रोज १ ते २ रूग्ण कुत्रा चावल्यामुळे उपचारासाठी येत
आहेत.

पुण्याच्या हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्थेकडून श्वान दंश प्रतिबंधक ‘रेबिज’च्या लशींचा जिल्हा सामान्य रूग्णालयास पुरवठा होतो. संस्थेकडे ९ हजार लशींची मागणी नोंदविली असताना १७५० लशींचा पुरवठा झाला आहे. त्यांचा जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालये, उप जिल्हा रूग्णालये, जिल्हा रूग्णालयास पुरवठा करण्यात आला आहे. सध्या जिल्हा रूग्णालयाकडे ८०० डोस शिल्लक आहेत. दरमहा दीड ते दोन हजार डोस लागतात. हाफकिन संस्थेत लशींचे उत्पादन होत असले तरी त्या ‘रूग्णांना वापरण्यास योग्य असे’ असे प्रमाणित होण्यासाठी विलंब लागतो. त्यामुळे मागणीनुसार पुरवठा होत नाही. मागणीच्या तुलनेत तुटवडा आहे. कुत्र्यांच्या वर्गीकरणानुसार लशी देण्याचा निर्णय डॉक्टर घेतात. पण, अनेकदा रूग्ण कुत्र्याने चाटले तरी इंजेक्शन देण्याचा आग्रह धरतात. हे चुकीचे आहे. त्यामुळे देखील मागणी वाढते.
-डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, अहमदनगर


कुत्र्यांमुळे निर्माण होणाºया वाढत्या समस्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना देखरेख समिती स्थापन करण्याच्या सूचना आहेत. समितीमार्फत भटके कुत्रे पकडणे, वाहतूक करणे, निर्बिजीकरण, लसीकरण, औषधोपचार,जनजागृती अपेक्षित असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही.

Web Title: Dogs Scarcity of vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.