गुहा परिसरात आढळला बारा वर्षाच्या मुलाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:26 PM2017-11-11T17:26:27+5:302017-11-11T17:29:44+5:30

नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर गुहा परिसरात बारा वर्ष वयोगटातील मुलाचा मृतदेह जळालेल्या आवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैज्ञानिक तपास पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे़ अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही.

The dead body of a 12-year-old boy was found in the guha area | गुहा परिसरात आढळला बारा वर्षाच्या मुलाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह

गुहा परिसरात आढळला बारा वर्षाच्या मुलाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह

googlenewsNext

राहुरी : नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर गुहा परिसरात बारा वर्ष वयोगटातील मुलाचा मृतदेह जळालेल्या आवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैज्ञानिक तपास पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे़ अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस उपधिक्षक अरूण जगताप, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, स्थानिक गुन्हे अन्वेशक विभागचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गायकवाड, डी़ डी़ गायकवाड, सतिश शिरसाट, राजेंद्र साळवे, गौतक लगड, हर्षवर्धन बहिर, निलेश मेटकर, सुरेश भिसे, प्रभाकर शिरसाट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

हद्दीवरुन रंगला वाद

नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर रामदेव धाब्यासमोर जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. गुहा व देवळाली प्रवरा यांच्या सिमेवर मृतदेह आढळल्याने हद्द कोणाची यावरुन वैद्यकीय अधिकारी व कामगार तलाठी यांच्यामध्ये वादंग सुरू झाले. या वादामुळेच वैद्यकीय अधिकारी व कामगार तलाठी यांनी येण्यास टाळाटाळ केली़ त्यामुळे तपास करणारी पोलीस यंत्रणाही आवक झाली. देवळाली प्रवरा व गुहा हद्दीतील वैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ केली. कोणीही दोन तास घटनास्थळी फिरकले नाही. अखेर राहुरी ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ सुधीर क्षीरसागर घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन केले.

Web Title: The dead body of a 12-year-old boy was found in the guha area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.