नगरसेवक कैलास गिरवले यांचे पुण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 09:18 AM2018-04-17T09:18:51+5:302018-04-17T09:27:19+5:30

मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले (वय ५५) यांचे पुण्यात उपचारादरम्यान सोमवारी रात्री निधन झाले.

Corporator Kailas Girwale passed away in Pune | नगरसेवक कैलास गिरवले यांचे पुण्यात निधन

नगरसेवक कैलास गिरवले यांचे पुण्यात निधन

Next

अहमदनगर : मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले (वय ५५) यांचे पुण्यात उपचारादरम्यान सोमवारी रात्री निधन झाले.

केडगाव येथील हत्याकांडानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक झाली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला झाला. या गुन्ह्यात गिरवले यांना अटक झाली होती. याप्रकरणी गिरवले न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना  कोतवाली पोलीस ठाण्यातील दुस-या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. या गुन्ह्यात त्यांना रविवारी न्यायालयीन कोठडीची मंजुरी मिळाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. गिरवले यांना उपचारासाठी प्रथम जिल्हा रूग्णालय व नंतर पुणे येथील ससूण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

गिरवले यांना रविवारी दिवसभर कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. मात्र सायंकाळी त्यांची प्रकृती ढासळली आणि अधिकच चिंताजनक बनली. गिरवले यांच्याबाबत रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर चुकीची अफवा पसरली. याबाबत पोलीस प्रशासनाने काल प्रसिद्धी पत्रक काढून गिरवले यांच्यावर ससूण रूग्णालयात उपचार सुरू असून, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले होते. मात्र रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला.

गिरवले यांचा परिचय

कैलास गिरवले हे सुरवातीला भाजपचे कार्यकर्ते होते. त्यानंतर त्यांनी महापालिकेची अपक्ष निवडणूक लढविली होती. तत्कालीन नगरपालिकेत ते दोनवेळा नगरसेवक झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही त्यांनी शहरात नेतृत्व केले. २००८ आणि २०१३ मध्ये मनसेत असताना त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण जगताप आणि संग्राम जगताप यांचे ते कट्टर समर्थक होते. महापालिकेतील घोटाळ््यांचा पर्दाफाश करणारे नगरसेवक म्हणून त्यांची सर्वांनाच भीती होती. परखड, स्पष्ट स्वभावामुळे महापालिकेतील कर्मचाºयांवर गिरवले यांचा नेहमीच वचक असायचा. काँग्रेसचे संदीप कोतकर यांना महापौर करण्यात गिरवले यांचा महत्त्वाचा वाटा होता. शिवसेनेच्या बारा नगरसेवकांना सेनेतून बाहेर काढून महानगर विकास आघाडी स्थापन करण्यात गिरवले यांचा पुढाकार होता. याच आघाडीच्या पाठिंब्यामुळे कोतकर महापौर झाले. माळीवाडा येथील कपिलेश्वर मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. गणेशोत्सवामध्ये विविध आकर्षक, धार्मिक देखावे, उपक्रम यामध्ये गिरवले नेहमीच आघाडीवर असायचे. जिल्हा फटाका असोसिएशनचे ते पदाधिकारी होते. फटाका विक्रीचा परवाना घेण्यासाठी तत्कालीन प्रांताधिकारी विकास पानसरे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्याची तक्रार गिरवले यांनी केली होती.

Web Title: Corporator Kailas Girwale passed away in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.