अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी धडकणार कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:25 PM2018-10-04T12:25:08+5:302018-10-04T12:25:12+5:30

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर जनसंघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

Congress Jan Sanghsh Yatra to hit Ahmednagar district on Tuesday | अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी धडकणार कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा

अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी धडकणार कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा

googlenewsNext

अहमदनगर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर जनसंघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. ही यात्रा जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात ९ आॅक्टोबर रोजी दाखल होणार आहे. प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.
सकाळी दहा ते दुपारी १२ वाजेदरम्यान संगमनेर येथे जाहिर सभा होणार आहे. त्यानंतर तेथून लोणीकडे प्रयाण केले जाणार आहे. लोणी येथेही यात्रेदरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर कोल्हार, श्रीरामपूर, राहुरी येथून यात्रा अहमदनगर शहरात चार वाजण्याच्या दरम्यान दाखल होणार आहे. अहमदनगर शहरात रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता उत्तर महाराष्ट्र विभागीय जाहिर सभा होणार आहे. या सभेनंतर यात्रा पुढे मार्गक्रमण करणार आहे.

Web Title: Congress Jan Sanghsh Yatra to hit Ahmednagar district on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.