काँग्रेसच्या जनसंघर्षवरून संगमनेरात विद्यार्थी संघटनांची जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 04:23 PM2018-10-09T16:23:01+5:302018-10-09T16:24:07+5:30

कॉँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आली असता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करत त्यांना सभेला येण्याची सूचना करण्यात आल्याचा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ईशान गणपुले यांनी सोशलमाध्यमाद्वारे केला.

 Congregations gathered in Sangamante from the Jan Sangh | काँग्रेसच्या जनसंघर्षवरून संगमनेरात विद्यार्थी संघटनांची जुंपली

काँग्रेसच्या जनसंघर्षवरून संगमनेरात विद्यार्थी संघटनांची जुंपली

Next
ठळक मुद्देसभेला उपस्थित राहण्याची सक्ती अभविपचा आरोप : एनएसयुआयकडून खंडन

संगमनेर : कॉँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आली असता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करत त्यांना सभेला येण्याची सूचना करण्यात आल्याचा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ईशान गणपुले यांनी सोशलमाध्यमाद्वारे केला. मात्र, असे काहीही झाले नसून विद्यार्थी स्वयंस्फूतीर्ने कॉँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत सहभागी झाल्याचे एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा म्हणाले.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका वर्गाच्या व्हॉटसअप समुहावर एक प्राध्यापक विद्यार्थ्यांना कॉलेजची नियोजित पुर्वपरीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना बिना गणवेश आणि ओळखपत्र एका राजकीय पक्षाच्या सभेत सहभागी व्हायच्या सुचना देतो. म्हणजे शैक्षणिक वेळापत्रकात राजकारणासाठी ढवळाढवळ करून विद्यार्थ्यांचे नुकसान करायचं आणि बाता शैक्षणिक प्रश्नांच्या करायचा. शिक्षणाच्या मंदिरातच यांनी राजकीय स्वाथार्चा धंदा उघडणाऱ्या अन स्वत:चा राजकीय स्वार्थ साधाणाºया पोरांच्या परीक्षांचा बळी देणाºयांना लाज वाटली पाहिजे. असा आरोप अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गणपुले यांनी सोशलमाध्यमाद्वारे केला.
यावर प्रतिक्रिया देताना एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष पापडेजा म्हणाले, जनसंघर्ष यात्रा ही सामाजातील सर्व घटकांसाठी आहे. तशीच ती विद्यार्थ्यांसाठीही आहे. तालुक्यातील सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या यात्रेत सहभागी होण्यासाठी एनएसयुआयच्या वतीने आव्हान करण्यात आले होते. अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांना सक्ती केली हा खोडसळपणा आहे. एक प्रकारे या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. विद्यार्थी हिताचा एकही निर्णय भाजप सरकारने घेतलेला नाही. आणि आता ते विद्यार्थी प्रेमाचा खोटा आव आणत आहे.

Web Title:  Congregations gathered in Sangamante from the Jan Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.