कोपरगावमधील अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:34 AM2018-04-01T11:34:21+5:302018-04-01T11:34:21+5:30

शहरातील अहमदनगर-मनमाड महामार्गावर भरधाव कंटेनरच्या धडकेत एक महाविद्यालयीन युवती ठार तर दुसरी गंभीर जखमी झाली

 College girl dies in collision in Kopargaon | कोपरगावमधील अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

कोपरगावमधील अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे दुसरी तरुणी जखमीचालकास अटक

कोपरगाव : शहरातील अहमदनगर-मनमाड महामार्गावर भरधाव कंटेनरच्या धडकेत एक महाविद्यालयीन युवती ठार तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी (दि.३१) रात्री घडली. महाविद्यालयीन तरुणी ऋतुजा विजय देवकर (वय १८ , रा. टाकळी) ही जागीच ठार झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर- मनमाड महामार्गावर नगरच्या दिशेने जाणा-या भरधाव कंटेनरने क्रमांक (एच.आर ५५, एबी- ०८०१) भरधाव वेगात चालला होता. दोन तरुणी आपल्या दुचाकीवरून जात होत्या. दुचाकीला पाठीमागून कंटेनरने जोराची धडक दिली. या धडकेमुळे महाविद्यालयीन तरुणी ऋतुजा विजय देवकर (वय १८ , रा. टाकळी) ही जागीच ठार झाली तर मिताली प्रमोद कपाटे (वय १८ रा. कान्हेगाव)) ही गंभीर जखमी झाली आहे. कंटेनर ड्रायव्हरला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Web Title:  College girl dies in collision in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.