चौंडीतील गोंधळ : ५१ जणांना अटक, ५ जूनपर्यत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:59 AM2018-06-02T11:59:44+5:302018-06-02T11:59:57+5:30

तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात गुरुवारी (दि. ३१) झालेल्या गोंधळप्रकरणी दोन निरनिराळ्या फिर्यादी दाखल झाल्या असून ५१ जणांना अटक करण्यात आली आहे.

Clutter in Chund: 51 people arrested, police custody till 5th June | चौंडीतील गोंधळ : ५१ जणांना अटक, ५ जूनपर्यत पोलीस कोठडी

चौंडीतील गोंधळ : ५१ जणांना अटक, ५ जूनपर्यत पोलीस कोठडी

जामखेड : तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात गुरुवारी (दि. ३१) झालेल्या गोंधळप्रकरणी दोन निरनिराळ्या फिर्यादी दाखल झाल्या असून ५१ जणांना अटक करण्यात आली आहे.
सुरेश उर्फ सुर्यकांत कांबळे (रा. वरूळ ता. भुम जि.उस्मानाबाद) यासह ३५ ते ४० आरोपींविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पाच पोलीस जखमी झाले आहे अशी फिर्याद पोलीस कॉ. गहिनीनाथ यादव यांनी दिली. तर दुसरी फिर्याद पो. कॉ. शामसुंदर जाधव यांनी दाखल केली आहे. यामध्ये बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष इंद्रकुमार भिसे यांच्यासह १६ जणांनी कट कारस्थान करून पालकमंत्री राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना आरक्षणाचे पत्रके काढून गोंधळ घातला व सरकारी कामात अडथळा आणला. तसेच पोलीस कर्मचारी संदीप पवार यास जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड मारला व डोके फोडले व जमावबंदी आदेशाचा भंग केला असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात सुरेश कांबळे, डॉ. इंद्रकुमार भिसे, रवी देशमुख हे गोंधळ घालणार असल्याचे समजल्यानंतर या तिघांना ३० व ३१ मे रोजी जिल्हा बंदीचे आदेश दिले होते. तशी नोटीसही त्यांना दिली होती. त्या अनुुषंगाने ३१ रोजी दुपारी सभेच्या ठिकाणी १.३० च्या सुमारास सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे ७० ते ८० कार्यकर्त्यांसह सभामंडपात आले व सभा चालू होण्यापूर्वी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. या बाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्या अनुुषंगाने वरिष्ठांनी व पोलीस आल्यानंतर कांबळे यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी कांबळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मारहाण केली. पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना पकडण्यात आले. यामध्ये सुरेश कांबळे (रा. वरूळ ता. भुम), काकासाहेब अप्पाराव मार्कं ड (रा. सोनगिरी ता. भुम), नागनाथ नरूटे (रा. आवारपिंपरी ता. परांडा), गणेश कारंडे (रा. खांबेवाडी ता. करमाळा), बालाजी गोयकर (रा. सुकटा-भुवनवाडी ता. भुम), हरीचंद्र धायगुडे (रा. हांगेवाडी ता.श्रीगोंदा), सुभाश देवकाते (रा. साडेसांगवी ता. भुम), नानासाहेब पवार (रा. कांरजा ता. परांडा), बाळू गडदे (रा. नारायण नगर मानवत ता. मानवत), अरूण शेरकर (रा. भुम ता. भुम), दीपक थोरात (रा. लहुजिनगर भुम ता. भुम),शिवाजी वाडीकर (रा. मुक्रमाबाद ता.मुखेड), दिलीप जाधव (रा. आसुली मुंडेकर वस्ती ता. भुम), राजकिरण योगकर (रा. गोयकर वस्ती आरसुली ता. भुम), आण्णा कोळेकर (रा. भोपलगाव ता. भुम), भागवत घोडके (रा. बिरोबाची वस्ती, भोपलगाव ता.भुम), शंकर तरटे (रा. नारायण नगर मानवत), लहू गायकवाड (रा. गोगलगाव ता. भुम), संदीप खराडे रा. परांडा, अक्षय रणदिवे (रा. परांडा), रवीशंंकर सोलापुरे (रा. भुम ता.भुम), युवराज हुबे (रा. विट ता भुम), अमोल सुरवसे (रा. लक्ष्मीनगर ता भुम), प्रवीण ठोंगे (रा. गांधीनगर ता. बार्शी), विनोद वाणी (रा. आगळगावरोड ता. बार्शी) ,तुकाराम बरकडे (रा. देवागाव ता. परांडा), समाधान हाडुळे (रा. विट ता. भुम), दत्तात्रय कन्हे (रा. सदााशिवनगर ता मााळशिरस), रोहन गाडे (रा. आलमप्रभुनगर ता. भुम), दत्ता महारनोर (रा. शिवाजीनगर परांड ता भुम), अंजिर महारनवर (रा.दिघी ता.कर्जत), दीपक महारनवर (रा.दिघी ता.कर्जत) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला व इतर विविध कलमान्यवे गुन्हे दाखल करण्यात आले. वरील सर्व ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांंना ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

पंधरा जणांना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी
४दुसरी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनचे पो.कॉ. श्यामसुंदर जाधव यांनी दिली. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या सभा मंडपामध्ये आरोपी इंद्रकुमार भिसे (रा. थिटेवाडी ता. कर्जत), किशोर मासाळ (रा. सुर्यानगरी ता. बारामती), नितीन मासाळ (रा.झारगडवाडी ता.बारामती), संतोश तावरे (रा. अंदोबावाडी पोस्ट माळेगाव ता. बारामती), सचिन गोरडकर (रा. भावडी ता. श्रीगोंदा) ,लहू घोडे (रा. टाकळी हाजी ता. शिरूर) ,शशिकांत चासकर (रा. भावडी ता. पारनेर), शुभम ढवण (रा. निघोज ता. पारनेर) , राहुल साबळे (रा. टाकळी हाजी ता. शिरूर) ,राजेंद्र कोळेकर (रा.सुर्यानगर बारामती), विशाल सुळ (रा. खडकी ता. करमाळा), भागेश महारनवर (रा. दिघी ता. कर्जत), कोंडीबा महारनवर (रा. दिघी ता.कर्जत) ,सुरज खोमने (रा. को-हाळे खुर्द ता. बारामती), संदीप मासाळ (रा.झारगडवाडी ता. बारामती), अनिल मासाळ (रा. काटेवाडी ता. बारामती), श्रीकृष्ण बजंगे (रा. बजरंगवाडी ता. कर्जत) या सर्वांनी कटकारस्थान करून पालकमंत्री राम शिंदे यांचे भाषण सुरू असताना मुख्य आरोपी इंद्रकुमार भिसे यांनी आरक्षणाचे पत्रके फेकले व गोंधळ घातला. त्यावेळी ३० ते ३५ कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केली होती.

साध्या वेशात असणाऱ्या पोलिसांनी इंद्रकुमार भिसे यास ताब्यात घेऊन जात असताना कार्यकर्त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला. पोलीस भिसे यांना घेऊन सरकारी गाडीत बसवत असताना भिसे याने पोलिसांच्या हाताला झटका देऊन त्यांच्या हातातून निसटला. व खाली बसून दगड घेऊन त्याने फिर्यादी श्यामसुंदर जाधव यांच्या सोबत साध्या वेषात असणारे स्थानिक गुन्हे अन्वेषण अहमदनगरचे कर्मचारी संदीप पवार यास जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड फेकून मारला. यामध्ये पवार यांचे डोके फुटले. तसेच जिल्हा उपविभागीय अधिकारी कर्जत १४४(२) प्रमाणे जिल्हा दंडाधिकारी जमावबंदीचा आदेशाचा भंग केला अशी फिर्याद श्यामसुंदर जाधव यांनी दिली आहे. भिसेसह इतर १५ जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक करून कर्जत येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. ५ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे

Web Title: Clutter in Chund: 51 people arrested, police custody till 5th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.