कुपोषण मुक्तीसाठी किलबिल कार्यक्रम

By admin | Published: May 30, 2014 11:15 PM2014-05-30T23:15:04+5:302014-05-31T00:23:04+5:30

अहमदनगर: जिल्ह्यात शाश्वत कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या पुढाकारातून किलबील प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

Chiller program for the release of malnutrition | कुपोषण मुक्तीसाठी किलबिल कार्यक्रम

कुपोषण मुक्तीसाठी किलबिल कार्यक्रम

Next

अहमदनगर: जिल्ह्यात शाश्वत कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न व्हावेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या पुढाकारातून किलबील प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महिला बालकल्याण विभागाच्या माध्यामातून राबविण्यात येणार्‍या या प्रकल्पात माहेर प्रकल्प आणि पंचसुत्री राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बालकांच्या वजन व वाढीकडे सनियंत्रण समितीच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत येणार आहे. मुख्य कार्यकारी नवाल यांनी जिल्ह्यात कुपोषण मुक्ती, शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि हागणदारी मुक्तीवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला. कुपोषण मुक्तीसाठी किलबील प्रकल्प आखला आहे. यात बाळाचे जन्मापूर्वीच्या उपाययोजना आणि बाळाच्या जन्मानंतरच्या उपाय योजना करण्यात येणार आहेत. यात गरोदर मातांसाठी माहेर प्रकल्प, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी जननी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच पंचसुत्री कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. माहेर प्रकल्पात जन्माला येणारे बाळ सुदृढ असणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी तीन महिने गरोदर मातांना अंगणवाडीत दररोज ११ ते ५ या काळात ठेवण्यात येणार असून त्यांना सकस आहार पुरविण्यात येणार आहे. गर्भसंस्कार, आरोग्य शिबिरे या व्दारे तिचे प्रबोधन करण्यात येणार आहे. जननी प्रकल्पात बालकाची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यास मातांचे समोपदेशन करण्यात येणार आहे. जन्माला येणार्‍या शंभर टक्के बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी विशेष करून अंगणवाडी सेविका प्रयत्न करणार आहेत. आजची मुलगी उद्याची माता असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या महिन्यात जिल्ह्यातील मुलींचे आणि गरोदर मातांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आले. गरोदर मातांचे सहा ते नऊ महिन्यांत १० किलो वजन वाढविण्याचे उदिष्ट आहे़ गरोदर मातांना आहाराविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे़ जेवणाच्या वेळांची माहिती दिली जाणार आहे़बाळंतपणानंतर स्तनपानाविषयीही मार्गदर्शन केले जाईल़ जेणेकरून मूल कुपोषित राहणार नाही़ सहा महिन्यांनंतर मुलांना दाळीचे पाणी, फळे आदी पदार्थ द्यावेत़ एवढी करूनही कुपोषित बालक आढळून आल्यास त्याचे व्यवस्थापन केले जाणार आहे़ पंचसूत्र कार्यक्रम आखण्यात आला असून,त्यामध्ये वरील सर्व बाबींचा समावेश आहे़ (प्रतिनिधी) गरोदर मातांना एसएमएसव्दारे माहिती गरोदर मातांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे़ परंतु काहीवेळा त्यांना आहाराविषयी मार्गदर्शन मिळत नाही़ त्यात जिल्हाभरात वाड्या वस्त्यांवर राहणार्‍या गरोदर मातांना प्रत्येकवेळी माहिती देणे शक्य नाही़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने पर्यवेक्षिकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यांच्यामार्फत एसएमएसव्दारे ही माहिती दिली जाणार आहे़ शालेय पूर्व शिक्षणही देणार बालकांना अंगणवाडीत येणाची गोडी आणि सवय लागावी, त्यांना सामान्य ज्ञान, रंग, पशुपक्षी, वस्तूची ओळख व्हावी यासाठी त्यांना पूर्व शालेय शिक्षणही देण्यात येणार आहे. अंगणवाडीत माध्यमिक शाळेच्या धर्तीवर तासिकेनुसार वेळपत्रक तयार करून बालकांना दररोज शालेय शिक्षणाचे धडे देण्यात येणार आहे. दरमहा मुलांच प्रगती पुरस्तक बालकांच्या पालकांना दाखविण्यात येणार आहेत, येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अशोक पावडे यांनी दिली. असा आहे पंचसूत्री कार्यक्रम किलबील प्रकल्पात राबविण्यात येणार्‍या पंचसुत्रीत पहिल्यांदा जन्माला येणार्‍या बालकांचे वजन वाढवण्यसाठी प्रयत्न करणे, प्रत्येक बालकला सहा महिन्यापर्यंत स्तनपान, आवश्यकता असल्यास पूरक आहार, कुपोषित बालकांचे व्यवस्थापन, किशोरवयीन मुलींची काळजी घेणे यांचा समावेश राहणार आहे. जिल्ह्यातील ५ हजार ३२२ अंगणवाडीत १५ जूननंतर कार्यक्रम राबवण्यास सुरूवात करण्यात येणार आहे.

Web Title: Chiller program for the release of malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.