जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात बुधवारी गारपिटीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 05:55 PM2018-03-04T17:55:01+5:302018-03-04T17:55:01+5:30

बुधवारी उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

 Chances of hailstorm in the central Maharashtra, including on Wednesday | जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात बुधवारी गारपिटीची शक्यता

जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात बुधवारी गारपिटीची शक्यता

Next
ठळक मुद्दे नगर जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने बुधवारी उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तसेच तापमानातही कमालीची घसरण झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे १५.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून सवार्धिक तापमान अकोला येथे ३९.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. त्यामुळे शेतक-यांपुढील चिंता वाढली आहे.

Web Title:  Chances of hailstorm in the central Maharashtra, including on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.