मुळा धरणाचे दोन्ही कालवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:37 PM2017-08-23T13:37:55+5:302017-08-23T13:38:14+5:30

मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणाचे दोन्ही कालवे बंद करण्यात आले आहेत़

Both the canals of the Mulala dam are closed | मुळा धरणाचे दोन्ही कालवे बंद

मुळा धरणाचे दोन्ही कालवे बंद

Next
हुरी : मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणाचे दोन्ही कालवे बंद करण्यात आले आहेत़ सोमवारी, मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़ बुधवारी सकाळी सूर्यदर्शन झाले. २६ हजार द. ल.घ.फू. पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाची पूर्ण भरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.राहुरी तालुक्यात पडलेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे़ कोरडेठाक असलेले बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत.उसावर पडलेल्या मावा व पांढºया माशीमुळे औषधे फवारून वैतागलेल्या शेतकºयांना दिलासा मिळणार आहे़ पावसामुळे उसावरील रोग जाण्यास मदत होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले़ तणनाशकामुळे गवताचे प्रमाण कमी झाले होते़ त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला होता़ मात्र दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे गवत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे़ दोन महिन्यांपासून पावसाने विश्रांती घेतली होती़ त्यामुळे धरणाच्या दोन्ही कालव्यांतून शेतीसाठी आवर्तन सुरू होते़ पर्यायाने धरणाच्या पाणीसाठ्यात घट होत होती़ मात्र पावसाच्या आगमनामुळे दोन्ही कालवे पाटबंधारे खात्याला बंद करावे लागले आहेत़ गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुळा धरण ओव्हर-फ्लो होण्याची संधी आहे़

Web Title: Both the canals of the Mulala dam are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.