अहमदनगर शहरात कुरीअर पार्सलमध्ये स्फोट, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:46 AM2018-03-21T11:46:38+5:302018-03-21T11:46:38+5:30

अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री उशीरा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. कुरिअर मालक सत्यजित भुजबळ (वय ३९. रा भिंगार ), कामगार संजय क्षीरसागर (वय -२५ ) आणि आणखी एकजण जखमी झाला आहे. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

 A bomb exploded in a courier parcel in Ahmadnagar city, three people injured | अहमदनगर शहरात कुरीअर पार्सलमध्ये स्फोट, तिघे जखमी

अहमदनगर शहरात कुरीअर पार्सलमध्ये स्फोट, तिघे जखमी

Next
ठळक मुद्देपोलिसांचा कसून तपास सुरु

अहमदनगर : अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरातील ढोर गल्लीत असलेल्या मारुती कुरिअर कार्यालयातील पार्सलमध्ये मंगळवारी रात्री उशीरा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. कुरिअर मालक सत्यजित भुजबळ (वय ३९. रा भिंगार ), कामगार संजय क्षीरसागर (वय -२५ ) आणि आणखी एकजण जखमी झाला आहे. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीचे कर्मचारी एक पार्सल सोडत होते. याचवेळी अचानक स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, दुकानाच्या पाय-यांवर रक्ताचा सडा पडला होता. जखमी तिघांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. कोतवाली पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोधक व निकामी पथकाकडून हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याची तपासणी सुरू आहे. स्फोटानंतर परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी गर्दी केली. अचानक झालेल्या या स्फोटाने नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. स्फोट झालेल्या पार्सलमध्ये नेमके काय होते, याचा बॉम्ब शोधक पथकाकडून शोध सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या चौकशीत कुरिअरमधील पार्सल सावेडीतून आलेले होते. पुणे येथे सामाजिक संस्था चालविणा-या सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावे हे पार्सल पाठविण्यात आले होते. पार्सल ज्या पत्त्यावरून पाठविण्यात आले होते, तो पत्ता चुकीचे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र हे पार्सल दुकानातील कर्मचारी का फोेडून पाहत होते, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा स्फोट बॉम्बस्फोट असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेचा कोतवाली पोलिसांसह दहशतवादी विरोधी पथक तपास करत आहेत.

 

 

Web Title:  A bomb exploded in a courier parcel in Ahmadnagar city, three people injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.