महाविकास आघाडी सरकारबाबत भाजपमध्ये चलबिचल; आमदार रोहित पवार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 02:39 PM2021-02-08T14:39:51+5:302021-02-08T14:41:03+5:30

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपला रूचले नाही. त्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे. आपल्या पक्षातील आमदार, पदाधिकारी इतर पक्षात जाऊ नयेत. यासाठी हे सरकार कोसळणार असे वक्तव्य भाजपचे नेते अमित शहा हे करीत असतात,  अशी टीका  राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी नगरमध्ये केली.

BJP in turmoil over Maha Vikas Aghadi government; Criticism of MLA Rohit Pawar | महाविकास आघाडी सरकारबाबत भाजपमध्ये चलबिचल; आमदार रोहित पवार यांची टीका

महाविकास आघाडी सरकारबाबत भाजपमध्ये चलबिचल; आमदार रोहित पवार यांची टीका

Next

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपला रूचले नाही. त्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे. आपल्या पक्षातील आमदार, पदाधिकारी इतर पक्षात जाऊ नयेत. यासाठी हे सरकार कोसळणार असे वक्तव्य भाजपचे नेते अमित शहा हे करीत असतात,  अशी टीका  राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी नगरमध्ये केली.

आमदार रोहित पवार हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदभार्त नगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  भाजप नेते अमित शहा यांनी ..तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती असे वक्तव्य केले. यावर पवार यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शेवटच्या काळात भाजपने विश्वासघात केला असे वाटले असावे. यामुळे त्यांनी  व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडी केली. नवे समिकरण तयार झाले. संपूर्ण देशभरातील घटक पक्षांचाही आवाज वाढला. हे भाजपला रूचले नाही. त्यामुळे हे अमित शहा यांचे व्यक्तीगत मत असावे, असेही पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकार तीन महिन्यात कोसळेल, असे वक्त्व्य करतात. परंतु १४ महिने झाले तरी सरकार कोसळू शकले नाही. आमचे सरकार शेतकरी हिताचे, विकासाचे आणि विचारांचे आहे, असेही आमदार पवार यावेळी म्हणाले. 

Web Title: BJP in turmoil over Maha Vikas Aghadi government; Criticism of MLA Rohit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.