भगवानगडावरील गर्दी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 05:48 PM2017-09-30T17:48:25+5:302017-09-30T17:48:25+5:30

पाथर्डी (जि. अहमदनगर) : सुमारे पंचवीस वर्षांपासून भगवानगडावर होणाºया दसरा मेळाव्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. दरवर्षीच्या तुलनेत शनिवारी भगवानगडावरील गर्दी कमी असली, तरी हजारो भाविकांनी दिवसभर सोयीच्या वेळेनुसार भगवानबाबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. ‘भगवानबाबा की जय’ अशा घोषणांनी गड दुमदुमवा. गडावर जमावबंदी लागू असल्याने भक्त समाधिस्थळाचे दर्शन घेऊन लगेच परतत होते.

bhagwangad,dasara,melawa,mahant,namdev,shatri | भगवानगडावरील गर्दी ओसरली

भगवानगडावरील गर्दी ओसरली

Next
थर्डी (जि. अहमदनगर) : सुमारे पंचवीस वर्षांपासून भगवानगडावर होणाºया दसरा मेळाव्याची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली. दरवर्षीच्या तुलनेत शनिवारी भगवानगडावरील गर्दी कमी असली, तरी हजारो भाविकांनी दिवसभर सोयीच्या वेळेनुसार भगवानबाबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. ‘भगवानबाबा की जय’ अशा घोषणांनी गड दुमदुमवा. गडावर जमावबंदी लागू असल्याने भक्त समाधिस्थळाचे दर्शन घेऊन लगेच परतत होते.भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी दसºयाच्या दिवशी राजकीय नेत्यांच्या भाषणबंदीचा ठराव सलग दुसºया वर्षी केल्याने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याचे स्थळ बदलले. भगवानबाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे मेळावा घेतल्याने गडावर गर्दी होणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. महंत डॉ. नामदेव शास्त्री व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात मेळाव्यावरून झालेल्या वादामुळे पोलिसांनी भगवानगडावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. गडावर जमावबंदीचा आदेश लागू होता. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी व्हॅन उभ्या केल्या होत्या. तसेच प्रत्येक ठिकाणी पोलीसांची वेगवेगळी पथके गडावर होती. शनिवारी सकाळी महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या हस्ते भगवानबाबांच्या समाधीला अभिषेक करण्यात आला. सकाळी गडावर शुकशुकाट होता, परंतु सकाळी अकरानंतर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. दुपारी भक्तांनी गटागटाने येत दर्शन घेतले. दर्शनानंतर भक्त गडावर थांबत नसल्यामुळे गर्दी दिसली नाही.-------------भगवानगडावर होणाºया मेळाव्याच्या मुद्यावरून झालेल्या वादाची पार्श्वभूमी पाहाता पोलिसांनी गडाच्या पायथ्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहने अडविली. त्यामुळे गडावर भाविकांना पायी जावे लागले. गडावर जाणाºया तिन्ही रस्त्यांवरून भाविक येताना दिसत होते. प्रत्येक पॉइंटवर पोलीस बंदोबस्त तैनात होता. सायंकाळच्या सुमारास भगवानगडावर सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री गुरुमंत्राचा कार्यक्रम पार पडला. गेल्या २५ वर्षांपासून दसºयाच्या दिवशी भगवानगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी असायची, परंतु आज मात्र तुलनेने गर्दी कमी होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे गडाला छावणीचे स्वरूप आले होते.---आमची काही दुकानदारी नाही. जो भगवानबाबांचा भक्त आहे, तो गडावर दर्शनासाठी येत आहे. सगळे भक्त एकत्रित नसल्यामुळे गर्दी दिसत नसली, तरी भक्त मोठ्या संख्येने गडावर येत आहेत. -डॉ. नामदेव शास्त्री, महंत भगवानगड---------

Web Title: bhagwangad,dasara,melawa,mahant,namdev,shatri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.