झेलम एक्सप्रेसमध्ये हरवलेली बॅग साईभक्ताला परत मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 07:05 PM2018-03-04T19:05:30+5:302018-03-04T19:05:30+5:30

झेलम एक्सप्रेसमधून प्रवास करणा-या साईभक्ताची बोगीमध्ये विसरलेली बॅग रेल्वे प्रशासनाच्या कारभारामुळे काही तासात मिळाली

The bag lost in Jhelum Express returned to Saibhakak | झेलम एक्सप्रेसमध्ये हरवलेली बॅग साईभक्ताला परत मिळाली

झेलम एक्सप्रेसमध्ये हरवलेली बॅग साईभक्ताला परत मिळाली

Next

श्रीरामपूर : झेलम एक्सप्रेसमधून प्रवास करणा-या साईभक्ताची बोगीमध्ये विसरलेली बॅग रेल्वे प्रशासनाच्या कारभारामुळे काही तासात मिळाली. श्रीरामपूर रेल्वेस्थानकावर झेलम आल्यानंतर बोगीमधील विसरलेली बॅग कर्मचारी नारायण खुंटे यांनी ताब्यात घेऊन स्टेशन मास्तर ओ.पी. भारती यांच्याकडे जमा केली. त्यानंतर बॅग ब्रम्हानंद रायकवार यांना सुपुर्द करण्यात आली.
झेलम एक्सप्रेस या गाडीतून गुरुवारी भोपाळ येथील साईभक्त ब्रम्हानंद रायकवार हे शिर्डीला साईबाबा दर्शनाला जाण्यासाठी कोपरगाव रेल्वेस्थानकावर उतरले. मात्र त्यांची बॅग ते बसलेल्या बोगीतच विसरुन राहिली. बॅगमध्ये त्यांचा मोबाईल, तीन तोळ््याचे सोन्याचे दागिने व महत्वाची कागदपत्रे होती. बॅग विसरल्याबाबत रायकवार यांनी कोपरगाव रेल्वेस्थानक प्रमुखाकडे तक्रार नोंदवली. यावरुन श्रीरामपूर रेल्वेस्टेशन प्रमुखास विसरलेल्या बॅगबद्दल माहिती दिली. झेलम एक्सप्रेस रेल्वेस्थानकावर येताच चितळी येथील रेल्वे कर्मचारी पॉईटस्मन नारायण खुंटे यांनी बॅग बोगीत शोधून स्टेशनप्रमुख भारती यांच्या ताब्यात दिली. रेल्वे पोलिस कर्मचारी आल्हाट व हे.कॉ.मीन यांच्यासमवेत बॅग साईभक्त रायकवार यांना शिर्डी येथे जावून ताब्यात दिली. रेल्वे कर्मचाºयाने सापडलेली बॅग परत करुन प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल साईभक्तांनी नारायण खुंटे यांचे आभार मानले.

 

Web Title: The bag lost in Jhelum Express returned to Saibhakak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.