अहमदनगर शहरात तणाव, पोलीस बंदोबस्तात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:23 PM2018-04-17T14:23:38+5:302018-04-17T14:25:49+5:30

पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणातील नगरसेवक कैलास गिरवले यांचा सोमवारी रात्री पुण्यात मृत्यू झाला. गिरवले यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अहवाल ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिला आहे.

Ahmednagar city tension, police constable increase | अहमदनगर शहरात तणाव, पोलीस बंदोबस्तात वाढ

अहमदनगर शहरात तणाव, पोलीस बंदोबस्तात वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देह्रदयविकाराच्या झटक्यानं गिरवले मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अहवाल मृत्यूस कारणीभूत पोलीसांवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी

अहमदनगर : पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणातील नगरसेवक कैलास गिरवले यांचा सोमवारी रात्री पुण्यात मृत्यू झाला. गिरवले यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अहवाल ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिला आहे.

दरम्यान गिरवले यांच्या मृत्यूनंतर शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. पोलीस मारहाणीत गिरवले यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून गुन्हे दाखल होईपर्यत अंत्यसंस्कार न करण्याची भुमिका घेतली आहे. मृत्यूस जबाबदार असणा-या पोलीसांवर कारवाई करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे. पुण्याहून मृतदेह घेऊन निघालेली अ‍ॅम्बुलन्स सुप्यानजीक उभी करण्यात आली असून गुन्हा दाखल झाल्यानंतरच मृतदेह नगरला आणण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या पार्श्वभुमिवर नगर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी गिरवले यांचे नातेवाईक कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान ससून हॉस्पिटलच्या अहवालात ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा अहवाल दिला आहे.
केडगाव दुहेरी हत्याकांडाप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड केली होती.त्यानंतर पोलीस अधीक्षक तोडफोडप्ररणी पोलीसांनी अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणात गिरवले यांचा समावेश होता. 

Web Title: Ahmednagar city tension, police constable increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.