अहमदनगर - पुणे महामार्गावर अपघात, महिलेसह दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 11:45 IST2018-05-20T11:45:23+5:302018-05-20T11:45:35+5:30

शनिवारी रात्री अहमदनगर - पुणे महामार्गावर चास शिवारात झालेल्या अपघात एका महिलेसह दोघे ठार झाले. वळणावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडल्याने हा अपघात झाला.

Ahmednagar - Accidents on the Pune highway, along with the woman, both killed | अहमदनगर - पुणे महामार्गावर अपघात, महिलेसह दोघे ठार

अहमदनगर - पुणे महामार्गावर अपघात, महिलेसह दोघे ठार

अहमदनगर : शनिवारी रात्री अहमदनगर - पुणे महामार्गावर चास शिवारात झालेल्या अपघात एका महिलेसह दोघे ठार झाले. वळणावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडल्याने हा अपघात झाला. दुस-या बाजूने येणा-या स्कॉर्पिओवर कंटेनर पलटी झाल्याने हा अपघात झाला.
कंटेनर पुण्याकडून नगरच्या दिशेने येत होता. तर स्कार्पिओ नगरहून- पुण्याचे दिशेने चालली होती. मात्र दुभाजक ओलांडून कंटेनर स्कॉर्पिओवर पलटी झाला. या अपघातात सिंधूबाई गायकवाड( बारामती) या ठार झाल्या. तर कंटेनरचा क्लिनरसह एकाचा मृत्यू झाला. याा अपघातामुळे पुणे महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली होती. नगर तालुका पोलीसांनी महामार्गावरील वाहने बाजूला केल्याने वाहतूक सुरळित झाली.

Web Title: Ahmednagar - Accidents on the Pune highway, along with the woman, both killed