अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:57 AM2018-01-25T02:57:03+5:302018-01-25T02:57:32+5:30

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर तीन वर्षांपासून अत्याचार करणा-या मुख्याध्यापकाविरुद्ध बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

Ahmadnagar: Atrocities against the teacher of the head by showing lover's wedding | अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

Next

अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर तीन वर्षांपासून अत्याचार करणा-या मुख्याध्यापकाविरुद्ध बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी शहरातील सबजेल चौक येथील सरस्वती नाइट स्कूलचा मुख्याध्यापक पांडुरंग कुंडलीक गवळी याला अटक केली आहे.
पीडितने सन २०१५मध्ये नाइट स्कूलमध्ये इयत्ता आठवीत प्रवेश घेतला होता़ रात्री ७ ते १० ही शाळेची वेळ होती़ गवळी तिला मोटारसायकलवर दररोज शाळेत घेऊन येत असे व शाळा सुटल्यावर घरी नेऊन सोडत असे. एक दिवस गवळीने तिला स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला़ तसेच वाच्यता न करण्यासाठी तिला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली़ त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून गवळी याने तिच्यावर सलग तीन वर्षे अत्याचार केले.

Web Title: Ahmadnagar: Atrocities against the teacher of the head by showing lover's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.