उपोषणानंतर अण्णा हजारेंच्या प्रकृतीत बिघाड, हॉस्पिटलमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 03:58 PM2019-02-14T15:58:14+5:302019-02-14T16:05:14+5:30

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. नगरमधील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे.

After fasting strike Anna Hazare hospitalized in Ahmadnagar | उपोषणानंतर अण्णा हजारेंच्या प्रकृतीत बिघाड, हॉस्पिटलमध्ये दाखल

उपोषणानंतर अण्णा हजारेंच्या प्रकृतीत बिघाड, हॉस्पिटलमध्ये दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देउपोषणानंतर अण्णा हजारेंच्या प्रकृतीत बिघाडअहमदनगर हॉस्पिटलमध्ये अण्णांवर उपचार सुरू

अहमदनगर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. नगरमधील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. लोकपाल नियुक्ती, आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून उपोषण आंदोलन छेडले होते. सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर तब्बल सात दिवसानंतर अण्णा आपले उपोषण थांबवले. मात्र यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघडली आहे. 

बुधवारपासून (13 फेब्रुवारी) अण्णांना अधिक थकवा जाणवू लागला. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय तपासण्या होणे खूप गरजेचं होते. या पार्श्वभूमीवर डॉ. सय्यद आणि डॉ. धनंजय पोटे यांच्या सल्ल्यानुसार अण्णांना तपासणीसाठी नगरला आणण्यात आले आहे. युनिटी हॉस्पिटलचे डॉ. सुहास घुले यांनी अण्णांच्या आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण केल्या असून सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. परंतु, त्यांना जास्त थकवा जाणवत असल्यामुळे डॉक्टरांनी आणखी काही तपासण्यांसाठी (पॅथॉलॉजिकल) आणि उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले आहे.  नोबल हॉस्पिटलमध्ये डॉ. बंदिष्टी आणि डॉ. कांडेकर यांच्या निगरानीखाली अण्णांवर उपचार सुरू आहेत.  

Web Title: After fasting strike Anna Hazare hospitalized in Ahmadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.