जामखेडमध्ये अपघात : दोन ठार, सोळा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:54 PM2018-06-01T13:54:12+5:302018-06-01T13:54:12+5:30

जामखेड - खर्डा रस्त्यावर शिऊर फाटा येथे ट्रक व स्लिपर लक्झरी कोच या दोन वाहनांचा समोरासमोर जोराची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यु झाला तर १६ जखमी झाले आहेत. 

Accident in Jamkhed: Two killed, sixteen injured | जामखेडमध्ये अपघात : दोन ठार, सोळा जखमी

जामखेडमध्ये अपघात : दोन ठार, सोळा जखमी

Next

जामखेड : जामखेड - खर्डा रस्त्यावर शिऊर फाटा येथे ट्रक व स्लिपर लक्झरी कोच या दोन वाहनांचा समोरासमोर जोराची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यु झाला तर १६ जखमी झाले आहेत. 
आज पहाटे चारच्या सुमारास पाऊस सुरु असताना पहाटे चारच्या सुमारास खर्डा जामखेड रस्त्यावर काटेवाडी शिवारात हैदराबाद कडून शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी जात असलेली लक्झरी व जामखेड कडून खर्डाकडे कांद्याने भरलेला ट्रक या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली. 
या अपघातातील जखमी झालेले टि. वी.  राव (वय -५०, विजयवाडा), विनोद कुमार ( वय ३०), नारायन यन्नु (वय-४५), पी. अहमद (वय ५०), जितेंद्र कुमार(वय-३८), मधुसुदन रेड्डी ए (वय ४६), सुनिता पी (वय ४०), शेख लतीब (वय ३५), खलील  शेख(वय ४५) सर्व हैद्राबाद येथील आहेत.

 

Web Title: Accident in Jamkhed: Two killed, sixteen injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.