३७ दूध डेअरी व संकलन केंद्रांवर भेसळीचा ठपका

By admin | Published: May 25, 2014 12:05 AM2014-05-25T00:05:11+5:302014-05-25T00:35:07+5:30

विनोद गोळे, पारनेर नगर जिल्ह्यात दूधभेसळीने पुन्हा डोके वर काढले असून सुमारे ३७ दूध डेअरी,संकलन केंद्रांमधील दुधामध्ये भेसळ असल्याचा ठपका नाशिक विभागीय अन्न व औषध प्रशासनाने ठेवला.

37 adulteration in milk dairy and collection centers | ३७ दूध डेअरी व संकलन केंद्रांवर भेसळीचा ठपका

३७ दूध डेअरी व संकलन केंद्रांवर भेसळीचा ठपका

Next

विनोद गोळे, पारनेर नगर जिल्ह्यात दूधभेसळीने पुन्हा डोके वर काढले असून सुमारे ३७ दूध डेअरी,संकलन केंद्रांमधील दुधामध्ये भेसळ असल्याचा ठपका नाशिक विभागीय अन्न व औषध प्रशासनाने ठेवला असून त्यांना सुमारे बारा लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही मोठी कारवाई ठरली असून यामुळे दूध उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. यात पारनेर तालुक्यातील सात दूध डेअरींचा समावेश आहे. नगर जिल्ह्यात दुधामध्ये भेसळ करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत होते.त्यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी दुधात भेसळ करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.नंतर मात्र दूध भेसळ करणार्‍यांच्या विरोधातील कारवाई थंडावली होती.मात्र नाशिक विभागाचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त चं.भा.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी निलेश खोसे यांच्या पथकाने नगर जिल्ह्यातील दूध डेअरी,संकलन केंद्र,हॉटेल यासह विविध अन्नपदार्थांची चौकशी करताना अप्रमाणित,भेसळ,कमी दर्जाचे ,लेबल नसलेले अन्नपदार्थ यांचे सुमारे ६९ ठिकाणचे नमुने घेतले होते. त्यात दुधाची सर्वाधिक ३७ प्रकरणे होती त्यात दुधात भेसळ असल्याचा ठपका ठेवत बारा लाख रूपयांचा दंड अन्न सुरक्षा अधिकारी व न्यायनिर्णय कक्षाचे प्रमुख निलेश खोसे यांनी ठोठावला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे पारनेर तालुक्यातील असून सात संस्थांचा समावेश आहे. त्या खालोखाल श्रीगोंदा व नगर तालुक्यातील संस्थांचा समावेश आहे. यामुळे दुधात भेसळ होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे उघड झाले आहे. आयुक्त विभागाने भेसळखोरांची नावे मात्र गोपनीय ठेवली आहेत.अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कडक अंमलबजावणी करताना विशेष पथकामार्फत दूध भेसळ व अन्न पदार्थांत भेसळ करणार्‍या विरोधात कारवाई सुरूच राहणार आहे.नगर जिल्ह्यात दुधातील भेसळीच्या ३७ प्रकरणांसह इतर ३२ प्रकरणांतील व्यावसायिकांवर केलेल्या कारवाईत सुमारे पंचवीस लाख पंचवीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. -निलेश खोसे, अन्न सुरक्षा अधिकारी न्यायनिर्णय कक्ष, नाशिक

Web Title: 37 adulteration in milk dairy and collection centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.