आध्यात्मिक बुध्दिमत्तेमुळे मन प्रसन्न, स्थिर व शांत राहते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 08:05 PM2019-03-09T20:05:26+5:302019-03-09T20:05:56+5:30

अनेक प्रकारच्या बुद्धिमत्तांपैकी एक म्हणजे आध्यात्मिक बुद्धिमत्ता'. या बुद्धिमत्तेमुळे आपल्याला आपलं मन प्रसन्न, स्थिर आणि शांत ठेवायला, तसेच, कोणत्याही ...

Spiritual intelligence makes the mind happy, steady and calm | आध्यात्मिक बुध्दिमत्तेमुळे मन प्रसन्न, स्थिर व शांत राहते

आध्यात्मिक बुध्दिमत्तेमुळे मन प्रसन्न, स्थिर व शांत राहते

googlenewsNext

अनेक प्रकारच्या बुद्धिमत्तांपैकी एक म्हणजे आध्यात्मिक बुद्धिमत्ता'. या बुद्धिमत्तेमुळे आपल्याला आपलं मन प्रसन्न, स्थिर आणि शांत ठेवायला, तसेच, कोणत्याही दु:खावर मात करायला मदत होते.

आपलं मन आणि त्याचे विविध पैलु समजून घेत, आपल्या मनाला समावस्थेकडे नेणं म्हणजे आध्यात्म'. त्याकरिता योग, ध्यान, मंत्र, यज्ञ, पुजा, प्रार्थना, धर्म, देव इ. विविध मार्ग आहेत. त्यांचा बुद्धिनिष्ठ अभ्यास, आपल्याला, मनशक्ती केंद्राच्या पुढील उपक्रमांत, साहित्यांत आणि उत्पादनांमध्ये मिळेल. 

आध्यात्मिकता हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा स्थायीभाव असून, तो जीवनाच्या अत्युच्च सुखाशी व ध्येयाशी जोडलेला आहे. सर्व धर्म, पंथ, संप्रदाय, संस्कृती यांच्या पलीकडं जाऊन ही आध्यात्मिक वृत्ती माणसाला प्रेरित करीत असते. जीवनाचा अर्थ लावण्यास मदत करते.

नीतिमान व मूल्याधिष्ठित जीवन जगण्यास दिशा देते. कोणत्याही प्रकारची धार्मिक कट्टरता, द्वेष, अंधश्रद्धा आदी अनिष्ट गोष्टींपासून खरी आध्यात्मिकता अलिप्त असते, ती ढोंगबाजीला बळी पडत नाही आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला दूर लोटत नाही.

-ह.भ. प अभिनंदन गायकवाड महाराज, सोलापूर

Web Title: Spiritual intelligence makes the mind happy, steady and calm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.