सगुण निर्गुण एकु गोविंदु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:43 PM2018-10-30T12:43:00+5:302018-10-30T12:43:14+5:30

निर्गुण परब्रह्माला निर्गुणो पासक भक्तास प्रसन्न होणे कठीण पडते

Saguna Nirgun Eku Govindu | सगुण निर्गुण एकु गोविंदु

सगुण निर्गुण एकु गोविंदु

Next

निर्गुण परब्रह्माला निर्गुणो पासक भक्तास प्रसन्न होणे कठीण पडते. कारण, मुळीच त्या भावनेने त्या भक्ताने निर्गुणाचेच चिंतन केलेले असते. त्यामुळे त्याशी सगुण होताच येत नाही. कारण
‘‘ये यथा मां प्रपद्यंते तास्तथैव भज्याम्यहम्’’
‘‘या हशी भावना यस्य सिद्धिर्भवति ता हशी’’
वेदांत वाक्याप्रमाणे परमेश्वराचे वर्तन घडते. तो आरश्याप्रमाणे आहे. हृदयात जसा धराल तसा तो प्रतिबिंबीत होईल आणि सगुण ब्रम्हास सगुणोपासकाबरोबर साक्षात्काराने किंवा रूपदर्शनाने अथवा देहधारणा करून, प्रत्यक्ष किंवा पर्यायाने लीला करून दाखवितो व भक्तांशी रममाण होता ओळख होण्यास जशी समान जाती लागते. तशाच रितीने भक्त व भक्ती यांची समान जाती अनुभवास येते. समान जातीवरून त्याप्रमाणे साक्षात्कार सुद्धा अनुभवास येत नाही. विरुद्ध जातीची तर ओळखच होत नाही. दृश्य व अदृश्य किंवा अदृश्य व दृश्य यांची ओळख होऊ शकेल; परंतु अदृश्याची व दृश्याची ओळख मुळीच होत नाही. असाच याचा सिद्धांत आहे आणि म्हणूनच निर्गुणाची उपासना करणाऱ्यापेक्षा सगुणांची उपासना करणारा चांगला असे भगवद् गीता अध्याय १२ श्लोक २.।.५ यात वर्णन केलेले आहे आणि ते यथार्थ आहे.
निर्गुण परमात्म्यापेक्षा सगुण देवामध्ये (१) आपर्ण शक्ती व (२) विक्षेप शक्ती जास्त असते. असे वर्णन धर्मग्रंथात आढळते. निर्गुण परमात्मा शांत अश्या प्रकाशाप्रमाणे आहे. म्हणून तो सर्वांच्या हृदयात असला तरी मनुष्याला पापकर्मापासून परावृत्त करण्यास असमर्थ आहे व पुण्यकार्यामध्ये मग्नता ठेवण्यास सुद्धा निर्गुण निराकार परमात्मा असमर्थ आहे. या उलट सगुण साकार परमात्मा पाप कर्मापासून भक्ताला परावृत्त करतो व पुण्यकर्मामध्ये रत करतो म्हणून सगुणाचे उपासक ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तया सत्कर्मी रती वाढो. तर दुसरे सगुणाची उपासना करणारे संत म्हणतात.
तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्ण ।
घातलीया भय नरका जाणे ।।
शिवमहिम्न्न स्तोत्रामध्ये सुद्धा पुष्पदंत नावाचा शिवभक्त सगुण आणि निर्गुणाचे वर्णन करताना म्हणतो,
स कस्य स्तोतव्य कतिविध गुण: कस्य विषय:
हे परमात्मा तुझ्या निर्गुण निराकार स्वरुपाचे वर्णन कोण बरे करु शकेल.
पदे त्वर्वाचीने पतती न मन: कस्यनक्च:
हे भगवान शंकरा तुझ्या सगुण साकार रूपावर कोणाच्या मनाची इंद्रियांची व वाणीची प्रीती जडणार नाही बरे ! तर सर्वांची जडेल !
-दादा महाराज जोशी, जळगाव

Web Title: Saguna Nirgun Eku Govindu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.