सकारात्मक विचारानेच जीवनात यशप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 05:09 PM2019-01-19T17:09:03+5:302019-01-19T17:09:10+5:30

संत तुकाराम माऊलींनी अत्यंत मार्मिक स्वरूपात कर्माची फळे वरीलप्रमाणे वर्णन केली आहेत. मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर सद्विचार सद्वर्तन यांची कास धरून मोक्ष पंत आगमन करणे शक्य आहे.

Positive thinking Will bring Success in life | सकारात्मक विचारानेच जीवनात यशप्राप्ती

सकारात्मक विचारानेच जीवनात यशप्राप्ती

Next

- भालचंद्र संगनवार
बीज तेंचि फळ येईल शेवटी ।
लाभ हनितुटी ज्याची तया।।
संत तुकाराम माऊलींनी अत्यंत मार्मिक स्वरूपात कर्माची फळे वरीलप्रमाणे वर्णन केली आहेत. मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर सद्विचार सद्वर्तन यांची कास धरून मोक्ष पंत आगमन करणे शक्य आहे. असे असतानादेखील काम, क्रोध, मद, मत्सर अशा गुणांचा अंगीकार केला जातो. आणि शेवटी काय तर हे कसे झाले यावर चिंता करीत बसतो. आयुष्यभराची कामे केली. त्याचे फळ निश्चितच प्राप्त होते. चांगल्या गोष्टी अंगीकार केल्यास चांगल्या गोष्टी दृष्टिक्षेपात येतात. 

पेरिलीया एरंड । 
ऊस मागील कवण्या तोंड ।। 

आपल्या शेतात जर एरंड लावले असेल तर ऊस येईल आणि मी त्याचा गोड रस तयार करण्याची अपेक्षा फक्त मूर्ख व्यक्तीच करतात. आपल्या आजूबाजूच्या विविध प्रवृत्ती दिसून येतात. सर्व वाईटच घडते आहे असे नाही. कित्येक व्यक्ती आणि प्रसंग या ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती देऊन जातात. बहुतांशी ध्येयवेडे समाजाच्या, निसर्गाच्या, परंपरेच्या वाढीसाठी रात्रंदिवस कष्ट करताना दिसतात. त्यांना कोणीही प्रेरित करीत नाही तर ते अंत:प्रेरणेने कार्य करताना दिसतात. ईश्वराचा पाईक या नात्याने चांगल्या विचारांनी ते प्रेरित असतात आणि समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. हे करीत असताना मात्र ते अत्यंत निर्विकार व निरागस पद्धतीने त्यांचे कार्य करतात. जसे काही मानवरुपात आगात शक्ती अवतरले आहे. या कार्याचा मात्र ते कधी दंभाचार, गर्व, मत्सर अथवा गवगवा करीत नाही. या उलट ते म्हणतात,

फोडीले भांडार धन्याचा हा माल ।
तेथे मी हमाल भार वाही ।।

या भूमातेचे, निसर्गाचे व समाजाचे प्रत्येक प्राणिमात्राला अनंत उपकार आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत निसर्गावर व समाजावर अवलंबून राहावे लागते. त्यात स्वत:च्या श्रमाचा वाटा असणे क्रमप्राप्त आहे. तो श्रमाचा वाटा किती प्रमाणात आहे, याला महत्त्व नसून तो किती सात्विक भावनेने व प्रेरणेने केलेला आहे, याला महत्त्व आहे. याचे एक उदाहरण म्हणजे एका जंगलात वणवा पेटला होता. वाढली झाडे, पाणी तर आगीच्या भक्ष्यस्थानी होते तर त्यासोबत उभी डोलदार झाडेदेखील गिळंकृत करीत होती. आपापल्यापरीने सर्वांनी मिळून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न स्थानिक करीत होते. त्यामध्येच एक चिमणी आपल्या चोचीत जेवढे पाण्याचे थेंब असतील तेवढे थेंब  घ्यायचे आणि जेथे वणवा पेटला होता त्यावर आणून शिडकाव करू लागली. असा आग विझविण्याचा चिमणीचा प्रयत्न चालूच होता. ही बाब तेवढीच सत्य होती की, तिच्या योगदानाने फारसा फरक पडणार नव्हता. तेवढ्यात दुसºया पक्ष्याने विचारले की, हे तू काय करतेस? तुला माहिती आहे तुझ्या इवल्याशा चोचीतील पाण्याने या आगीवर नियंत्रण आणले जाऊ शकत नाही. त्यावर त्या चिमणीने उत्तर दिले... हे मी जाणते; परंतु प्रयत्न करणाºयाच्या यादीत मी असेल. जेणेकरून हताशी, निरुत्साही प्रवृत्ती माझ्याजवळदेखील फिरकणार नाही. समाजात जाणून-बुजून अलिप्त स्वरूपाच्या काही व्यक्ती असतात. जसे त्यांची या पृथ्वीतळाशी काही देणेघेणे नाही आणि या भूतलावर ते पाहुणे आहेत. त्यांचे विश्व हे स्व म्हणजेच मी आणि माझे यामध्येच विलुप्त झालेले आहे. 
अशा अनुभूतीबाबत संत कबीर म्हणतात,
बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर। 
पण ती को छाया नही फल लागे अति दूर ।।

खजुराच्या झाडासारखे मोठे होऊन काही समाजाच्या उपयोगाचे नाही तर आपल्यात सकारात्मक समाजहित साधावे हीच अपेक्षा.

(लेखक वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत)

Web Title: Positive thinking Will bring Success in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.