नवकार मंत्राचा जप करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 02:32 AM2018-09-08T02:32:43+5:302018-09-08T02:33:01+5:30

नवकार मंत्राचा जप करीत असताना तो तन-मन व मधुरवाणीने केल्यास त्याचा लाभ त्वरित व हमखास मिळतो. नवकारमंत्रामध्ये उच्चारण शुद्ध असले पाहिजे. रस्व, दीर्घ शब्दाचे उच्चारण त्यानुसारच झाले पाहिजे.

Navkar Mantra ... | नवकार मंत्राचा जप करा...

नवकार मंत्राचा जप करा...

googlenewsNext

- साध्वीश्री सौम्यदर्शनाश्रीजी

नवकार मंत्राचा जप करीत असताना तो तन-मन व मधुरवाणीने केल्यास त्याचा लाभ त्वरित व हमखास मिळतो. नवकारमंत्रामध्ये उच्चारण शुद्ध असले पाहिजे. रस्व, दीर्घ शब्दाचे उच्चारण त्यानुसारच झाले पाहिजे. तेव्हाच त्याचा प्रभाव पडू शकतो. मंत्राबरोबर मनाला एकाग्रतेने जोडावे व मग बघा त्याचा प्रभाव. मनाने जपलेला मंत्रच आपली रक्षा करतो. ६८ हजार विद्यांनी नवकार महामंत्र बनले आहे. या महामंत्राच्या माध्यमातून आपल्या आत्म्यात समकिताचे बीज पेरले जात असते आणि म्हणूनच प्रभू महावीर झाले. नवकार महामंत्राने आपले आभा मंडळ प्रभावित होत असते. नवकार महामंत्रासारखे दुसरा कोणताही महामांगलिक मंत्र नाही. शरीरातील सर्व व्याधी नवकार महामंत्राच्या जपाने दूर केल्या जाऊ शकतात.
आपण स्वत:ला घडवू शकतो. तुम्ही मनपासून नवकार महामंत्राचा जप केला, तर तुम्हाला नक्कीच परमेश्वराचे दर्शन घडू शकते. म्हणून मनुष्याने आधी व्यसनमुक्त होऊन संस्कारी झाले पाहिजे. मुलांना संस्कारी
बनवा. त्यांना जास्त पतंगासारखी ढील देऊ
नका. पतंगाची दोर जशी आपण ताणून धरतो,
तशीच ताणून धरा.
आपल्या परिवारात अथवा समाजात
कोणीही धार्मिक कार्य करीत असेल, तेव्हा त्याच्या धार्मिक कार्यात कोणीही कोणत्याही प्रकारचे
अडथळे आणू नये. एका वर्षात तीन चातुर्मास येतात. फाल्गुणी, कार्तिकी, आषाढी. या तिघांमध्ये आषाढी चातुर्मासाला जास्त महत्त्व आहे. पावसाळ्यात तन व मनाला गारवा मिळत असतो. वातावरणात प्रसन्नता असते. म्हणूनच या काळात जास्त व्रत व स्वाध्याय करू शकता.
चातुर्मास काळात अभिग्रह धारण करण्याची प्रेरणा मिळत असते आणि म्हणूनच संकल्प आणि नियम स्वत: अंगीकृत करून धार्मिक कार्यात समरस व्हा. साधू-संतांकडे जाण्याचे मनुष्य नेहमी टाळत असतो. कारण त्यांना भीती असते की, साधू-संत आपल्याला नियम पाळण्यास बाध्य करतील. मात्र, नियम आपल्या जीवनाचे कल्याण करू शकतात.

Web Title: Navkar Mantra ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.