मन: शांती - मनवा.. पोपटपंची सब व्यर्थ है....! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 09:27 PM2019-03-16T21:27:17+5:302019-03-16T21:27:41+5:30

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी पाऊले ,आज दर्शन करावयास मिळतील का ? हा विचार माझ्या  मनात आजही घोळतोय....

Mana Shanti - Manva .. Popatapanchi all is useless ....! | मन: शांती - मनवा.. पोपटपंची सब व्यर्थ है....! 

मन: शांती - मनवा.. पोपटपंची सब व्यर्थ है....! 

Next

- डॉ. दत्ता कोहिनकर- 
रविवारचा दिवस, सुट्टी असल्यामुळे निवांत सोफ्यावर पेपर वाचत बसलो होतो. तेवढ्यात राजाभाऊचा फोन आला. तो म्हणाला अरण्येश्?वर मंदिराच्या सभागृहात माझे गुरू दीनानाथ महाराजांचे प्रवचन आहे. अर्धा त्यास ते ज्ञानेश्वरीवर निरूपण करणार आहेत. त्यानंतर भक्तदर्शन व प्रसादग्रहण असा कार्यक्रम आहे. त्यानंतर तुम्हाला व त्यांना माज्या घरी न्यायची माझी तीव्र इच्छा आहे. तरी आपण आवरून तयार रहा. मी आपल्याला न्यावयास येतो अशी विनंती राजाभाऊंनी केली. 
तासाभरातच राजाभाऊ कार घेऊन मला न्यायला आला व आम्ही दोघेही महाराजांच्या प्रवचनस्थळी पोहचलो. महाराज ज्ञानेशवरीवर प्रवचन देते होते. जे जे भेटे भूत - ते ते मानावे भगवंत (प्रत्येक प्राण्यात ईश्वराचा अंश आहे, तो ईश्वरच आहे.) यावर महाराजांनी अर्धा तास खूप सुंदर विवेचन केले. प्रवचन संपल्यावर भक्तमंडळींची तुडूंब गर्दी , साष्टांग दंडवत व आशीर्वद प्रदान -प्रसाद ग्रहण कार्यक्रम संपल्यावर महाराज राजाभाऊंच्या गाडीत बसले. गाडीत महाराजांचा जप(नामस्मरण) जोरात चालू होता. 
नेमके मित्रमंडळ चौकात एका तरूणाने राजाभाऊच्या गाडीला डॅश मारला व तो राजाभाऊलाच शिवीगाळ करू लागला. मी दोघांना समजवण्याच्या प्रयत्नात असतानाच महाराज पुढे आले व त्यांनी त्या तरूणाला मला ओळखतो का नायक?  हजारो लोक माज्या पाया पडतात असे म्हणत महाराजांनी त्या तरूणाला धक्काबुक्की केली. मी महाराजांना हात जोडून गाडीत बसवले व समजोता करून पुन्हा राजाभाऊंनी गाडी सुरू केली. राजाभाऊंच्या घरी महाराजांचे स्वागत जोरात झाले. माज्या मनात एकच विचार जोरात घोळत होता. ह्यह्यजे जे भेटे भूत - ते ते मानावे भगवंत प्रत्येक प्राण्यात देवच आहे हे अर्धा तास लोकांना समजावून सांगणारे महाराज वेळ आल्यानंतर समोरच्या माणसातील देवत्व का नाही पाहू शकले ? त्यावेळी आचार्य ओशोंच्या प्रवचनातील एक गोष्ट मला लगेच आठवली. 
एका राजाकडे एक संन्यासी येतो. एकाच वेळी हजारो लोकांना आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर ह्यअध्यात्मह्ण समजावून सांगण्यात त्याची खूप किर्ती पसरलेली असते. एकदा तो राजाच्या राजमहालावर येतो. राजा आपल्या अलिशान बेडवर निवांत बसलेला असतो. दासी त्याला वारा घालत त्यांची सेवा करत असते. राजाला तो संन्यासी सर्वस्वाचा त्याग करून अध्यात्ममार्गात प्रवेश करण्याचा सल्ला देतो. राजा, त्या संन्याशाला आपल्या राजवाडयातच ऐश्वर्यसंपन्न खोली राहावयास देतो. दुसºया दिवशी संन्यासी राजवाड्यासमोरच असलेल्या पिंपळाच्या पारावर जप करत बसलेला राजाला दिसतो. राजा आपल्या लोकांना चारही बाजूने राजमहाल पेटवण्यास सांगतो. राजमहाल पेटताच संन्याशाचे लक्ष पेटत्या राजमहालाकडे जाते, तो पळत राजाजवळ येऊ म्हणतो, महाराज हे काय केले  ?  महाराज संन्याशाला म्हणाले, तुम्ही तर सांगितले ना, सर्वस्वाचा त्याग करायला - म्हणून मी महालच पेटवून दिला. आगीचे उसळलेले डोम पाहून संन्यासी जोरात ओरडला. महाराज थांबा-थांबा. माझी लंगोट आतील रूममध्येच राहिलीय व तो पळत राजवाड्यात शिरला. 
राजाला सर्वस्वाचा त्याग करावयास सांगणारा व हजारो लोकांना प्रवचन देणारा संन्यासी मात्र आपला लंगोट सोडू शकत नव्हता. 
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी पाऊले ,आज दर्शन करावयास मिळतील का ? हा विचार माझ्या  मनात आजही घोळतोय. खरोखर मित्रांनो प्रॅक्टीकल आयुष्य जगणं खूप महत्वाचं आहे. एक का होईना सदविचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न करू या .?? पोपटपंची सब व्यर्थ है... .

Web Title: Mana Shanti - Manva .. Popatapanchi all is useless ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.