अरे संसार संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 09:03 PM2019-06-29T21:03:41+5:302019-06-29T21:06:59+5:30

मित्राच्या लग्नाच्या पुजेला गेलो होतो. जेवताना प्रल्हाद शिंदेच्या आवाजातील गाणं कानावर आलं, ‘‘बायको तुझी गोरी-गोरी-बसवू नको डोईवरी, नेम नाही रे कधी - हाती देईल तुरी’’॥ व गाणं ऐकून राहूलची आठवण झाली.

importance of lovable relationship with wife | अरे संसार संसार

अरे संसार संसार

Next

-डॉ. दत्ता कोहिनकर

मित्राच्या लग्नाच्या पुजेला गेलो होतो. जेवताना प्रल्हाद शिंदेच्या आवाजातील गाणं कानावर आलं, ‘‘बायको तुझी गोरी-गोरी-बसवू नको डोईवरी, नेम नाही रे कधी - हाती देईल तुरी’’॥ व गाणं ऐकून राहूलची आठवण झाली. राहूल हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. सधन कुटूंब - वडील सरपंच, घराण्याचा रूबाब, प्रतिष्ठा, पुर्वापार घराण्याने जपलेली संस्कृती, माय-लेकांचे एकमेकांवर अतोनात प्रेम. राहूल हा घराण्यातला पहिलाच उच्चशिक्षित अभियंता. राहूलचे लग्न नात्यातील बागायतदाराची मुलगी सुनीताबरोबर ठरले.

सुनीता देखील आकर्षक व्यक्तीमत्व असलेली हुशार, कर्तव्यदक्ष, अभियंता तरूणी. लग्न ठरताच राहूलच्या आईने राहूल आपल्यापासून लग्नानंतर दूर जाऊ नये म्हणून, राहूलला, बायकोला डोक्यावर बसवायचे नाही, तिला आपल्या धाकात व आज्ञेतच ठेवायचे, पुरूषार्थ दाखवायचा, स्त्री ही उपभोगाची दासी असते. अशा अनेक प्रकारचे उपदेश केले होते. इकडे सुनीताच्या आईने देखील सुनीताला पहिल्यापासूनच वेगळं राहण्याचा प्रयत्न कर. नवर्‍याला आपल्या मुठीत ठेवायचे असते. अशा अनेक प्रकारचे उपदेशपर वेळोवेळी डोस पाजले होते. लग्नानंतर राहूल पुरूषार्थ गाजवायचा तर सुनीता त्याला आपल्या मुठीत ठेवायला पाहायची. शेवटी सुनीताला बर्‍याचदा मारही खावा लागायचा. एक दिवस तुफान भांडणानंतर राहूलने सुनीताला शिवीगाळ व मारहाण केली व माहेरी निघून जा अशी धमकी दिली. सुनीता रागाने माहेरी निघून गेली. तिच्या घरच्यांनी राहूल विरोधात पोलिसांत तक्रार केली. या सर्व गोष्टींचा राहूलवर परिणाम होऊन त्याला प्रचंड नैराश्य आले. त्यातून बाहेर पडण्यासाठी मित्रांनी त्याला ध्यान शिबिरासाठी पाठवले होते.

राहूलची सर्व व्यथा ऐकल्यानंतर मी राहुलला म्हणालो," राहूल- पत्नी ही आपली अर्धांगिनी असते." आपल्या घराचा -वंशाचा उद्धार करणारी व आपल्या सर्व गरजा पूर्ण करणारी ती एक आदीशक्ती असते. सासरी येताना ती आपल्या कुटूंबाचा - आडनावाचा - सग्या, सोयर्‍यांचा त्याग करून आपल्या घरात आलेली असते. There is no life without wife.. ‘पत्नीशिवाय जीवन व्यर्थ आहे’’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. ती सर्वांगाने खरी आहे. संसारात संतुष्ट पत्नी म्हणजे साक्षात ऐश्‍वर्यलक्ष्मीला आमंत्रण देणारी गृहलक्ष्मीच असते. ज्या घरात स्त्रीयांचा सन्मान होतो तेथे सगळया शुभशक्ती मदत करत असतात. घराची सर्वच देखभाल ती करते म्हणून गृहमंत्री म्हणून तिला मान दे. सर्वांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणारी ती एक अन्नमंत्री पण असते. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देणारी ती एक शिक्षणमंत्री पण असते. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्यमंत्री पण ती असते. तीच सरस्वती, तीच अन्नपूर्णा, तीच जगदंबा अशी पूजनीय स्त्री हा कुटूंबरूपी किल्ल्याचा महत्वाचा बुरूज असतो. तो बुरूज व्यवस्थित व मजबूत असण्यासाठी आपण तिला समान न्याय-हक्क-स्वातंत्र्य-मान-स्पेस दिली पाहिजे. पती व मुलांसाठी ती आपलं सर्वस्व अर्पण करते. एखाद्या दिवशी पती व मुले गावाला गेली तर ती एकटी असताना कधीच स्वतःच्या आवडीचा स्वयंपाक करत नाही, असेल ते खाते. घरात सगळयांची जेवण झाल्यानंतर उरलेले भोजन ती खात असते. शिळेपाळे न फेकता नाश्ता म्हणून खाणे ती आपलेच कर्तव्य समजते. ती प्रेमाची भुकेली असते. तिचे हृदय हे मुके असते, ते बोलत नाही. प्रेममय कलश घेऊन तिच्या अंतःकरणात आपल्या पतीने प्रवेश करावा असे तिला मनोमन वाटत असते. शंकर भगवान जसे हलाहल पिऊन देखील जगाचे कल्याण करतात तसेच स्त्री ही निंदा-अपमान-मार-शिव्याशाप याचे विष मुकाट्याने पीते व पुन्हा घराच्या सेवेसाठी सज्ज होते. त्यामुळे आपल्या पत्नीला न्याय दे व तिच्यावर प्रेमाचा अविष्कार कर.

चर्चेनंतर त्याची चुक त्याला उमगली. राहूल सासरी गेला. पत्नीची अंतःकरणापासून माफी मागितली. दिलगीरी व्यक्त केली. दोघेही ध्यानशिबीराला बसले. शिबीरानंतर त्यांच्या पत्नीचे देखील समुपदेशन केले. तिलाही तिची चुक कळाली आज त्याचा संसार सुखाने चालू आहे. मुलामुलींच्या आईवडीलांनी मात्र यातून योग्य तो बोध घेतल्यास मुलामुलींच्या संसाररूपी वेलीला नक्कीच बहर येईल.

Web Title: importance of lovable relationship with wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.