सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 1

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 03:59 PM2017-07-22T15:59:58+5:302017-07-25T16:10:58+5:30

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे.सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत.

Easy to sorrow is difficult to sorrow - Part 1 | सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 1

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 1

Next

- सदगुरू श्री वामनराव पै
सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे.सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत. दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण असे म्हणायला पाहिजे होते त्या ऐवजी वामनराव चुकून उलट सांगत आहेत असे तुम्हांला वाटण्याची शक्यता आहे. तुम्हांला असे वाटण्याचे कारण असे की आपण आतापर्यंत जे काही वाचत आलो ऐकत आलो ते असे की सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे. सुख किती जवाएवढे व दु:ख किती पर्वताएवढे पण जीववविद्या असे सांगते की सुख पर्वताएवढे व दु:ख जवाएवढे असे व्हायला पाहिजे. असे होवू शकते पण त्यासाठी काय  करायला हवे ते फार महत्वाचे आहे. दु:ख हे जन्मापासूनच माणसाच्या पाठीमागे लागते असे म्हटले जाते. जन्म दु:खम जरा दु:खम असे कोणीतरी एके ठिकाणी म्हटलेले आहे. जन्माला आल्यापासून दु:ख जे मागे लागते ते अगदी मरेपर्यंत असे म्हणण्याचा त्यांचा हेतू आहे.एके ठिकाणी असेही म्हटलेले आहे की “संसारा मानी जो सुख तो परम मुर्ख” “संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची” असेही काही ठिकाणी म्हटलेले आहे.कुणी काय काय म्हटलेले आहे हयाची मला जाणीव आहे.तरीही मी सांगतो सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण.आता यावर तुम्ही म्हणाल,”वामनराव आम्ही जे काही आतापर्यंत ऐकले त्याच्या नेमके उलट तुम्ही सांगता हे कसे काय? तसेच आम्ही आतापर्यंत ऐकत आलो की परमेश्वर कॄपा करतो किंवा कोप करतो पण तुम्ही म्हणता परमेश्ववर कोणावरही कृपाही करत नाही व कोपही करत नाही.तुमच्या जीवनविद्येत सगळंच कसे आगळं आणि वेगळं.”जीवनविद्येचे तत्वज्ञान खरेच आगळेवेगळे आहे.आणि तुम्ही ते आधी समजावून घ्यावे व तसे आचरण करण्याचा प्रयत्न करावा व तुम्ही सुखी व्हावे.किंबहूना तुम्ही आम्ही सारेच या तत्वज्ञानाने सुखी व्हावे अशी जीवनविद्येची संकल्पना आहे.यासाठी जीवनविद्येला असे मनापासून वाटते आपण सर्वांनी सुखी होऊ या.जगात काही जण सुखी तर काही जण दु:खी हे काही बरोबर नाही.आपण सर्व सुखी होऊ या. ही जीवनविद्येची भावना व धारणा आहे.जीवनविद्येची ही धारणा लक्षात घेवून जर तुम्ही जीवनविद्येचे तत्वज्ञान समजून घेतले तर तुम्हांला जीवनविद्येचे महत्व महात्म्य नक्कीच कळेल.पण त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण असे जर जीवनविद्या सांगते तर ते  नेमके कसे काय? कारण आमचा आतापर्यंतचा लोकांचा अनुभव असा आहे की दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण.बरे हा अनुभव फक्त आत्ताच्या लोकांचा आहे असा नव्हे तर पुरातन काळापासून तर  सर्वांचाच हा अनुभव आहे.

Web Title: Easy to sorrow is difficult to sorrow - Part 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.