आनंद तरंग : मोक्षप्राप्तीची साधना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 03:49 AM2019-06-01T03:49:54+5:302019-06-01T03:50:15+5:30

‘‘पार्था, ज्या परमभक्ताचे स्थिर मन फक्त माझ्यातच गुंतलेले आहे, जो परमभक्त सतत माझेच नाम घेत माझ्यातच आसक्त झालेला आहे अशा माझ्या परमप्रिय भक्ताला माझी वेगळी आठवण काढावी लागत नाही.

Anand Tarang: Sadhana of liberation | आनंद तरंग : मोक्षप्राप्तीची साधना

आनंद तरंग : मोक्षप्राप्तीची साधना

Next

वामनराव देशपांडे

परमभक्तीचे रहस्य उलगडून सांगताना भगवंत अर्जुनाला म्हणाले,
मयासक्तमना: पार्थ योगं युज्जन्मदाश्रय:।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्ययि तच्छृणु।।
‘‘पार्था, ज्या परमभक्ताचे स्थिर मन फक्त माझ्यातच गुंतलेले आहे, जो परमभक्त सतत माझेच नाम घेत माझ्यातच आसक्त झालेला आहे अशा माझ्या परमप्रिय भक्ताला माझी वेगळी आठवण काढावी लागत नाही. सावली जशी आपल्या देहाबरोबर असते ना, तसा माझा परमभक्त माझ्या सावलीसारखा माझ्याबरोबर असतो. तो भक्त माझ्याच सोबत राहतो. त्याला खात्री असते की, माझा आश्रय एकदा का लाभला की, मानवी आयुष्य लाभलेला तो परमभक्त कुठल्याही स्वरूपातल्या चिंता अथवा काळजीचे काळेभोर ढग त्याच्या जगत असलेल्या आयुष्यावर ओथंबून येत नाहीत. माझ्या शाश्वत अस्तित्वाशी तो सहजपणे जोडला जातो. पार्था, तू माझा तसा परमभक्त हो आणि माझ्या ब्रह्मांडव्यापी स्वरूपाला समग्रपणे जाणून घे. तू एक कायम लक्षात ठेव की, ज्या परमभक्ताचे मन माझ्यात पूर्णांशाने आसक्त झालेले आहे, जो माझाच आश्रित झालेला आहे, तो योगी पुरुष, परमात्म्याशी क्षणभर का होईना, असा वियोग होईल असे देहाशी निगडित असलेले ‘मी’ संबंधीचे कर्म करीतच नाही रे, पार्था, म्हणून तू तुझे मन, चित्त, बुद्धी, तुझी सर्व इंद्रिये माझ्यातच आसक्त कर. शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी साधकापाशी अतुट श्रद्धा हवी की, या मायेने ओेथंबलेल्या मर्त्य भ्रममूलक दृश्य विश्वात परमेश्वरी तत्त्व फक्त सत्य आहे. हे सत्य एकदा का जाणिवेच्या पातळीवर आपल्या अंत:करणात स्थिर झाले की खऱ्या अर्थाने आपल्या मोक्षप्राप्तीच्या साधनेला सुरुवात होेते.

Web Title: Anand Tarang: Sadhana of liberation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.