झेडपी कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत रिक्षा सुसाट

By नितीन काळेल | Published: May 29, 2023 11:51 AM2023-05-29T11:51:40+5:302023-05-29T11:51:57+5:30

वरदविनायक पॅनलची सत्ता : विरोधी ‘श्री अष्टविनायक’चा १५-० ने धुरळा

Rickshaw fast in ZP Employees Credit Union Elections | झेडपी कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत रिक्षा सुसाट

झेडपी कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत रिक्षा सुसाट

googlenewsNext

- नितीन काळेल 
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्हा परिषद कर्मचारी आर्थिक सहकार सहायक संस्था निवडणुकीत वरद विनायक पॅनलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकत विरोधी श्री अष्टविनायक पॅनलचा धुरळा उडवला. विशेष म्हणजे या सर्व जागा ८० ते १०० मतांच्या फरकाने जिंकल्या आहेत. तर विजयी झालेल्या उमेदवारांचे निवडणूक चिन्ह हे रिक्षा होते.

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक झाली. एकूण १५ जागांसाठी मतदान झाले. यासाठी ६२५ मतदार होते. त्यामधील ५८८ जणांनीच हक्क बजावला. या निवडणुकीत वरद विनायक पॅनलचे सुनील कापसे, श्रीरंग गोडसे, राकेश जाधव, प्रशांत पवार, किरण पाटणे, प्रशांत भोईटे, सुनील भोसले, प्रशांत साळुंखे, संग्रामसिंह साळुंखे, सागर साळुंखे, तुकाराम खाडे, अविनाश कवळे, अरुण गुरव, हेमलता ग्रामोपाध्ये आणि राखी घोरपडे हे विजयी झाले.

वरदविनायक पॅनलचे नेतृत्व अमोल पवार, दिनकर चव्हाण, प्रशांत तुपे, सागर साळुंखे, मारुती जाधव, विलास जाधव, तुषार निकम, रामचंद्र सपकाळ आदींनी केले होते.

सागर साळुंखेंचा चाैकार अन् गुलालाची उधळण...
पतसंस्थेचे अध्यक्ष सागर साळुंखे होते. यावेळी त्यांनी पतसंस्थेची चाैथ्यांदा निवडणूक लढविली आणि विजयीही झाले. त्यामुळे त्यांनी सलग चाैकार ठोकला आहे. तर, या विजयानंतर वरद विनायक पॅनलच्या विजयी उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. 

Web Title: Rickshaw fast in ZP Employees Credit Union Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.