पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रमुख मुरलीधर मोहोळ तर महापालिका प्रमुख राजेश पांडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 21:34 IST2023-06-08T21:16:58+5:302023-06-08T21:34:17+5:30
लोकसभेसह विधानसभा व महापालिका निवडणुकीतही भाजप मागील वेळेप्रमाणेच चमकदार कामगिरी करणार, मोहोळ यांचा विश्वास

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रमुख मुरलीधर मोहोळ तर महापालिका प्रमुख राजेश पांडे
पुणे: लोकसभेच्या पुणे शहर मतदारसंघासाठी प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाने माजी महापौर मुरलीधऱ् मोहोळ यांची नियुक्ती केली. पुणे महापालिका निवडणूकीसाठी राजेश पांडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ व ४८ लोकसभा मतदारसंघ तसेच महापालिका निवडणुकांसाठी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यात मोहोळ यांच्याकडे पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातीलच मावळ, शिरूर, बारामती या अन्य लोकसभा मतदारसंघांसाठी अनुक्रमे प्रशांत ठाकूर, आमदार महेश लांडगे व आमदार राहूल कूल यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघाचे बावनकुळे यांनी जाहीर केलेले प्रमुख याप्रमाणे, जुन्नर- आशा बुचके, आंबेगाव- जयश्री पलांडे, खेड-आळंदी- अतूल देशमुख, शिरूर-प्रदीप कंद, दौंड- गणेश आखाडे, इंदापूर- हर्षवर्धन पाटील, बारामती- रंजन तावरे, पुरंदर- बाबाराजे जाधवराव, भोर-किरण दगडे, मावळ-रवी भेगडे, चिंचवड- काळूराम बारणे, पिंपरी- अमित गोरखे, भोसरी- विकास डोळस, वडगाव शेरी- जगदीश मुळीक, शिवाजीनगर- दत्ता खाडे, कोथरूड-पुनीत जोशी, खडकवासला- सचिन मोरे, पर्वती- जितेंद्र पोळेकर, हडपसर- योगेश टिळेकर, कॅन्टोन्मेट- अजिंक्य वाळेकर, कसबा हेमंत रासने.
पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडू, लोकसभेसह विधानसभा व महापालिका निवडणुकीतही भाजप मागील वेळेप्रमाणेच चमकदार कामगिरी करेल असा विश्वास मोहोळ व पांडे यांनी नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.