शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

जिल्हा परिषद अविश्वासासाठी युतीचे संख्याबळच जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 22:03 IST

जिल्हा परिषदेतील तीन सभापतींवर अविश्वास दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप-शिवसेना सदस्यांची बैठक येथे पार पडली. याबैठकीत स्थानिक पातळीवर यापुढे युतीत अर्थात एकजुटीने राहण्याचा संकल्प करण्यात आला.

ठळक मुद्देएकजुटीचा संकल्प : मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप-सेनेची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतील तीन सभापतींवर अविश्वास दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप-शिवसेना सदस्यांची बैठक येथे पार पडली. याबैठकीत स्थानिक पातळीवर यापुढे युतीत अर्थात एकजुटीने राहण्याचा संकल्प करण्यात आला.जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस- भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता आहे. शिवसेना गेली दोन वर्ष विरोधी बाकावर आहे. भाजपने आघाडीच्या मदतीने सत्तेचा लाभ घेतल्यानंतर आता अचानक युती आणि एकजुटीची भाषा केली जाऊ लागली आहे. सेनेला सत्तेतून दूर ठेवण्यासाठीच भाजपने अभद्र युती केली होती. मात्र आता आॅक्टोबरमध्ये विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपत असल्याने सत्तेचे नवे गणित शिवसेनेला सोबत घेऊन मांडण्याचा भाजपचा डाव आहे. केंद्रात व राज्यात आपली युती असल्याने आता स्थानिक पातळीवर व पुढील निवडणुकांमध्येसुद्धा युती ठेवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.लोकसभा व विधानसभेसाठी युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप-सेनेने यवतमाळ जिल्हा परिषदेत तीन सभापतींवर अविश्वास दाखल केला. त्या अनुषंगाने ३ मे रोजी जिल्हा परिषदेची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पालकमंत्री मदन येरावार, सहपालकमंत्री संजय राठोड, माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे भाजप-सेनेच्या सदस्यांची बैठक पार पडली. ३८ पैकी एक-दोन सदस्य वैयक्तिक कारणाने गैरहजर होते. या बैठकीत भविष्यात एकजुटीने राहण्याचा संकल्प केला गेला. अविश्वास ठराव पारित होण्यासाठी ४१ सदस्य लागणार आहे. परंतु युतीकडे ३८ सदस्य जुळत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता नसल्याने तीन सदस्य जुळण्याची चिन्हे नाहीत. पर्यायाने अविश्वास बारगळण्याचीच शक्यता अधिक आहे.आज राष्ट्रवादीची पुसदमध्ये बैठकअविश्वासाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या सदस्यांची पुसदमध्ये आमदार मनोहरराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होत आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे धोरण ठरणार आहे. पुसदचे संख्याबळ अधिक असतानाही दोन वर्षांपूर्वी नीमिष मानकर यांना दिलेले सभापतीपद, त्यानंतर त्यांच्याकडून मिळणारी वागणूक या मुद्यावरून पुसदच्या या सदस्यांमध्ये नाराजी होती. ही नाराजी कायम आहे, मात्र अंतिम निर्णय आमदार नाईक यांच्यावर सोडल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले.दोनच दिवसापूर्वी माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचीही बैठक पार पडली. बैठकीतूनच आ.नाईक यांच्याशी संपर्क करून जिल्हा परिषदेमध्ये एकजूट राहण्याचा संकल्प केला गेल्याची माहिती आहे. युती व आघाडीने एकजुटीचा संकल्प केल्याने कुणीच फुटणार नाही व अविश्वास प्रस्ताव बारगळेल असेच एकंदर चित्र आहे.अध्यक्षांना वगळण्यामागे विधानसभेचे गणितअविश्वासातून जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांना वगळण्यात आले आहे. यामागे महिला अध्यक्ष असल्याने तीन मते अधिक (४१ + ३ = ४४) असे कारण पुढे केले गेले. परंतु प्रत्यक्षात राजकीय समीकरण यामागे असल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाज निर्णायक आहे. चार महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. बंजारा समाजाची नाराजी राहू नये, हा समाज पाठिशी रहावा म्हणून जिल्हा परिषदेमध्ये अविश्वास आणताना भाजप-सेनेने अध्यक्ष माधुरी आडे यांना जाणीवपूर्वक वगळले. या माध्यमातून नाईकांचीही नाराजी नको म्हणून सावधगिरी बाळगली गेली. भाजप-सेनेच्या विधानसभा लढू इच्छिणाºया नेत्यांसाठी ही बाब जमेची दिसत असली तरी कुणबी-मराठा समाज या नेत्यांवर नाराज आहे. कारण अविश्वास प्रस्ताव दाखल केलेले तीनही सभापती कुणबी समाजाचे आहेत. जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केले गेल्याची भावना कुणबी समाजात आहे. आधीच जिल्ह्यात मराठा-कुणबी नेतृत्व संपल्याची-संपविल्याची ओरड आहे. त्यातच आता जिल्हा परिषदेमध्ये खास कुणबी-मराठा समाजाच्या सभापतींना सत्तेच्या खुर्चीतून खाली ओढण्याचा डाव रचला गेल्याने भाजप-सेनेच्या प्रमुख नेत्यांविरुद्ध कुणबी समाजात नाराजी पहायला मिळते. त्याचा फटका त्यांना लगतच्या निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा युतीतून मराठा समाजाच्या उमेदवाराविरोधात काम झाल्याची ओरड आहे. २३ मेच्या निकालानंतर ते स्पष्ट होणार असून त्यानंतर युतीच्या नेत्याविरोधात मराठा समाजातील नाराजीचा भडका उडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. हा भडका उडाल्यास आगामी विधानसभेत युतीच्या प्रमुख नेत्यांचे चेहरे पोळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :zpजिल्हा परिषद