शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची सभा ऑफलाईन की ऑनलाईन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST

गेल्या वर्षभरात ऑफलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा न झाल्याने समस्या कायम असल्याचा आरोप विरोधकांनी सुरूच ठेवला आहे. नुकतेच दोन सदस्यांनी याबाबत संताप व्यक्त करीत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची उचलून थेट तळमजल्यावर आणून ठेवली होती. त्यांनीही प्रोसिडिंगसह ऑफलाईन सभा घेण्याची मागणी लावून धरली होती. दरम्यान, ८ सप्टेंबरची सर्वसाधारण सभा निश्चित झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येत्या ८ सप्टेंबरला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, ही सभा ऑफलाईन होणार की ऑनलाईन याबाबतचा गुंता अद्यापही कायम आहे. सत्ताधाऱ्यांचा ऑनलाईनवर, तर विरोधकांचा ऑफलाईनवर भर दिसून येत आहे. कोरोनामुळे गेल्या अनेक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यात संबंधित तालुक्यातील सदस्यांनी पंचायत समितीत एकत्र येऊन आपल्या समस्या मांडल्या. मात्र, या समस्या मांडताना अनेकांना तांत्रिक बाबींचा अडथळा आला. आवाज कमी जास्त होणे, स्पष्ट ऐकू न येणे, सदस्याचा व्यवस्थित परिचय न मिळणे, आदी बाबी दिसून आल्या. अनेकदा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तूतून सदस्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही तक्रार झाली. विरोधकांनी समस्या मांडूच दिल्या जात नाही, असा आरोप केला. सोयीच्या सदस्यांनाच ऑनलाईन सभेत बोलू दिले जाते, असा आरोप विरोधकांनी सातत्याने केला. मात्र, शासकीय नियमांचा दाखला देऊन सत्ताधाऱ्यांनी ऑनलाईन सभेचे सातत्याने समर्थनच केले. गेल्या वर्षभरात ऑफलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा न झाल्याने समस्या कायम असल्याचा आरोप विरोधकांनी सुरूच ठेवला आहे. नुकतेच दोन सदस्यांनी याबाबत संताप व्यक्त करीत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची उचलून थेट तळमजल्यावर आणून ठेवली होती. त्यांनीही प्रोसिडिंगसह ऑफलाईन सभा घेण्याची मागणी लावून धरली होती. दरम्यान, ८ सप्टेंबरची सर्वसाधारण सभा निश्चित झाली होती. सभेच्या नोटीसवर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यास ही सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सदस्यांना कळविले जाईल, अशी टीपही टाकण्यात आल्याची माहिती डेप्युटी सीईओंनी दिली. ही सभा विद्यमान पदाधिकारी व सदस्यांच्या कार्यकाळातील शेवटचीच सभा ठरण्याची शक्यता आहे. दर तीन महिन्यांनंतर सर्वसाधारण सभा घेतली जाते. मात्र, तीन महिन्यांनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची लगबग सुरू होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही शेवटचीच सभा ठरण्याची शक्यता बळावली आहे.

पदाधिकाऱ्यांमध्ये कुरबुर, सदस्यांमध्ये संतापगेल्या काही महिन्यांत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुरबुर वाढली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी अनेकदा नाराजी व्यक्त करीत आहेत. प्रशासन महाविकास आघाडीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनाच प्राधान्य देत असल्याची ओरड होत आहे. जिल्हा शिक्षक पुरस्कार निवडीवरूनही शिवसेना व काँग्रेस पदाधिकाऱ्यांत घमासान झाल्याची माहिती आहे. शिवसेनेचे पदाधिकारी या प्रक्रियेत नको त्या तालुक्यात लुडबूड करीत असल्याचे सांगितले जात आहे. आता कार्यकाळ संपत असताना पदाधिकारी सामूहिकपणे वागतात की त्यांच्यात सुंदोपसुंदी सुरूच राहते याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद