शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

जिल्हा परिषदेने टाळले ते ‘ईब्टा’ने साकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 6:00 AM

यावर्षी जिल्हा परिषदेने शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरितच केले नाही. त्यामुळे जिल्ह्याची परंपरा खंडित झाली होती. मात्र इब्टा संघटनेने शिक्षकांना एकत्र आणून जिल्हा स्तरीय पुरस्काराचा सोहळा पार पाडून ही परंपरा अखंड राखली.

ठळक मुद्दे१९ शिक्षकांचा सन्मान : क्रांतिसूर्य, क्रांतिज्योती आणि समाजभूषण पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी जिल्हा परिषदेने शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरितच केले नाही. त्यामुळे जिल्ह्याची परंपरा खंडित झाली होती. मात्र इब्टा संघटनेने शिक्षकांना एकत्र आणून जिल्हा स्तरीय पुरस्काराचा सोहळा पार पाडून ही परंपरा अखंड राखली.रविवारी इब्टा शिक्षक संघटनेच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहात हा पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. यावेळी संघटनेची जिल्हा कार्यकारिणीची सभाही पार पडली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईब्टाचे राज्य संघटक गजानन गायकवाड होते. प्रमुख अतिथी वाशिम जिल्हाध्यक्ष दीपक जावडे होते. कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष दिवाकर राऊत, चंद्रकांत सुके, जगदीश आरमुरवार, अभय भुजाडे, गजानन हागे, अनिताताताई वऱ्हाडे, क्रांतीताई राऊत, मोडक, संतोष किनाके, प्रवीण ठाकरे, सचिन तंबाखे, निवास रामटेके, सुरेश काटेखाये, विकास मेशेवार, पारीसे व इतर शिक्षक उपस्थित होते.प्रास्ताविक दिवाकर राऊत यांनी केले. सूत्रसंचालन हेमराज कळंबे यांनी तर संतोष किनाके यांनी आभार मानले.या शिक्षकांना मिळाला पुरस्कारक्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार वणी निलेश सपाटे, प्रवीण मेश्राम, झरी विनोद बलकी, अमर मडावी, मारेगाव हेमराज कळंबे, पांढरकवडा प्रभाकर उताणे, घाटंजी विनोद ढाले, कळंब संदीप कोल्हे, आर्णी प्रशांत वंजारे, नेर गजेंद्र धर्माळे, दारव्हा संदीप मिरासे, दिग्रस आमीन चव्हाण, पुसद जगदीश जाधव, महागाव आकाश गुजरकर, उमरखेड शफी शेख, राळेगाव विजय ढाले यांना प्रदान करण्यात आला. तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जिल्हा पुरस्कार यवतमाळ रेखा पोयाम, बाभूळगाव लता वानखेडे यांना देण्यात आला. तर मारेगावचे केंद्र प्रमुख प्रदीप रामटेके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक