शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने ‘बर्थ डे केक’ कापणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 22:10 IST

आठवडी बाजार परिसरात यादव व पवार समर्थकांमध्ये धुसफूस सुरू आहे. जामनकरनगर घटनेनंतर दोन्ही गटातील सदस्यांना अटक झाली. मात्र पवार टोळीतील एक सदस्य जामिनावर बाहेर येणार असल्याची कुणकुण लागल्याने तारपुऱ्यातील यादव समर्थकांनी हल्ल्याची तयार केली होती.

ठळक मुद्देयवतमाळात गँगवॉर टळले : टोळीविरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आठवडी बाजार परिसरात यादव व पवार समर्थकांमध्ये धुसफूस सुरू आहे. जामनकरनगर घटनेनंतर दोन्ही गटातील सदस्यांना अटक झाली. मात्र पवार टोळीतील एक सदस्य जामिनावर बाहेर येणार असल्याची कुणकुण लागल्याने तारपुऱ्यातील यादव समर्थकांनी हल्ल्याची तयार केली होती. यासाठी जमवलेल्या शस्त्रसाठ्यातील तलवारीने गुरूवारी रात्री एकाने केक कापत ‘बर्थ डे सेलिब्रेट’ केला. याची माहिती मिळताच टोळी विरोधी पथकाने तिघांना अटक केली.अश्विन सुनील यादव (२२), विजय लक्ष्मीकांत मस्त (२२), विकास गणपतराव इंगळे (२०) सर्व रा. तारपुरा यांना टोळी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून धारदार तलवार, कोयता आणि चायनीज चाकू जप्त केला. अश्विन हा रौनक यादव गटाचा सक्रीय सदस्य आहे. नुकतीच बाबा पवार समर्थक व रौनक यादव यांच्यात सशस्त्र झडप झाली होती.अश्विनवर पवार टोळीतील असलमने हल्ला केला होता. यातून बरे होताच त्याने बदला घेण्यासाठी शस्त्रसाठा जमा केला. असलम हा कारागृहातून जामिनावर बाहेर येताच त्याचा गेम करण्याच्या तयारी होती. गुरूवारी अश्विनचा वाढदिवस होता. त्याने कारच्या बॉनेटवर केक ठेवून तलवारीने कापला. ही टोळी शहरात फिरत होती. याची माहिती मिळताच उपनिरीक्षक संतोष मनवर यांनी सापळा रचून शस्त्रासह तिघांना ताब्यात घेतले.यादव टोळीच्या दहशतीमुळे बाब्या पवार याने यवतमाळ शहर सोडले. तर त्याचे समर्थक कारागृहात आहेत. आता यादव टोळीतील उरल्यासुरल्या सदस्यांचीही कारागृहात रवानगी झाली आहे. या प्रकरणी अवधुतवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई एसपी एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंह जाधव, एसडीपीओ पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकूर, संजय दुबे, अमोल चौधरी, विनोद राठोड, किरण श्रीरामे, जयंत शेंडे, राजकुमार कांबळे, श्रीधर शेंडे, आकाश सहारे, शशिकांत चांदेकर, गौरव ठाकरे, योगेश गटलेवार, गणेश देवतळे यांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस