शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

लॉकडाऊनला कंटाळून मागितले इच्छामरण; यवतमाळातील बेरोजगाराचे पंतप्रधानांकडे आर्जव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 18:39 IST

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संसगार्पेक्षा उपासमारीनेच जीव जातो की काय अशी अवस्था आहे. त्यापूर्वीच इच्छामरणाची परवानगी द्यावी, असे आर्जव करणारे पत्र यवतमाळातील युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देउपासमार झाली असह्य

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संसगार्पेक्षा उपासमारीनेच जीव जातो की काय अशी अवस्था आहे. त्यापूर्वीच इच्छामरणाची परवानगी द्यावी, असे आर्जव करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. यवतमाळातील तारपुरा परिसरातील युवकाने लॉकडाऊनच्या परिणामाची दाहकताच या अजार्तून मांडली आहे.कुणाल चंदूजी चांदूरकर रा. जयभारत चौक तारपुरा असे या युवकाचे नाव आहे. त्याने १३ एप्रिल रोजी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून लॉकडाऊनमध्ये उपासमार होऊन मरण्यापेक्षा इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. केंद्र व राज्य सरकार अनेकांना धान्य, सिलिंडर व जनधनच्या खात्यात पैसे देत आहे. अशा योजनांचा लाभार्थी नसलेल्यांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. माज्या सारख्या अनेकांपुढे आता जगण्या-मरण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. माझा ऑनलाईन कामाचा व्यवसाय आहे. २० मार्चपासून हे काम पूर्णत: बंद आहे. सहा सदस्य असलेल्या कुटुंबाची जबाबदारी  आहे. जवळ असलेला पैसा संपला असून आता त्यांचे पालन पोषण कसे करायचे ही समस्या आहे. अशी व्यथा मांडताना लॉकडाऊन काळात सुरू असलेल्या काळ्याबाजाराकडेही त्याने लक्ष वेधले आहे. देशापुढील सीएए, एनआरसी या कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न मिटला, डबघाईस आलेल्या देशातील अर्थव्यवस्थेची समस्या संपली, पोलीस विभाग लॉकडाऊनच्या काळात, अवैध दारू, गुटखा, तंबाखू या माफियांना संरक्षण देत आहे. अवैध दारू विक्री, पानठेले जोरात सुरू असून जीवनावश्यक वस्तूही दामदुप्पट भावात विकल्या जात आहे. लॉकडाऊनचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे कुणाल चांदूरकर याने आपल्या निवेदनातून मांडले आहे.त्याच्या इच्छामरणाच्या परवानगी अर्जाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी व यवतमाळ तहसीलदार यांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे यांनी दिले आहे.

टॅग्स :SocialसामाजिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस