शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 22:24 IST

प्रवीण कवडूजी केराम (२३) रा. तलावफैल असे मृत युवकाचे नाव आहे. प्रवीण केराम हा कुख्यात अक्षय राठोड याच्यासाठी काम करत होता. नुकताच तो करण परोपटे याच्या हत्त्याकांडातील गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्याचा वाद आंबेडकरनगर, पाटीपुरा येथील युवकाशी झाला. यातूनच प्रवीणची हत्त्या करण्यात आली. त्याच्यावर साहील संजय रामटेके रा. आंबेडकरनगर, प्रफुल्ल गजबे, हर्षल चचाने, वेदांत मानकर, निखिल ऊर्फ पीजी यांनी हल्ला केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात मंगळवारी दुर्गादेवी विसर्जनाला सुरुवात झाली. याच मिरवणुकीत अक्षय राठोड टोळीतील प्रवीण केराम या युवकाचा रात्री ९.३० वाजता पाच जणांनी चाकूने भोसकून खून केला. प्रवीण केराम याला वाणीपुरा येथील गल्लीत गाठून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. प्रवीण कवडूजी केराम (२३) रा. तलावफैल असे मृत युवकाचे नाव आहे. प्रवीण केराम हा कुख्यात अक्षय राठोड याच्यासाठी काम करत होता. नुकताच तो करण परोपटे याच्या हत्त्याकांडातील गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्याचा वाद आंबेडकरनगर, पाटीपुरा येथील युवकाशी झाला. यातूनच प्रवीणची हत्त्या करण्यात आली. त्याच्यावर साहील संजय रामटेके रा. आंबेडकरनगर, प्रफुल्ल गजबे, हर्षल चचाने, वेदांत मानकर, निखिल ऊर्फ पीजी यांनी हल्ला केली. या पाच जणांनी प्रवीणला घेरून चाकूने वार केले. घटनेनंतर आरोपी पसार झाले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी जखमी प्रवीणला शासकीय रुग्णालयात दाखल केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्रीच यातील आरोपी साहील संजय रामटेके याला अटक केली. तर दुसऱ्या दिवशी निखिल ऊर्फ पीजी गौरकर आणि वेदांत मानकर या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. हर्षल चचाने व प्रफुल्ल गजबे हे दोन आरोपी पसार आहेत. या प्रकरणी हरीश अरुण मुळे याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी हत्त्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली; खुनाचे सत्र सुरूचआठवडीबाजार परिसरातही बुधवारी सायंकाळी दोघांमध्ये वाद झाला. यात एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर सेवाग्राम येथे उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांकडे कुणाचीही तक्रार आली नाही. ही घटनासुद्धा विसर्जन मिरवणूक वादातून घडल्याची चर्चा आहे. शहरात विसर्जन मिरवणुकीत जुन्या वादाचा वचपा काढण्याचे प्रकार वाढले आहे. शहरातील खुनाचे सत्र काही केल्या थांबण्यास तयार नाही. आर्णी मार्गावरही वाद झाल्याची चर्चा शहरात आहे. तेही प्रकरण पोलिसांकडे आले नाही. यावरून भविष्यात आणखी भीषण घटना घडण्याची शक्यता गुन्हेगारी वर्तुळात वर्तविली जात आहे.

आठवडीबाजारातही हल्लायवतमाळ येथील आठवडी बाजार परिसरात मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजता धक्का लागल्यावरून वाद घालत एकाने धारदार चाकूने वार केले. यात आकाश गौतम शिरसाट (रा. फुकटनगर) हा जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून राजू किसन वाघाडे (रा. पाटीपुरा) याच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी