शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

खळबळजनक! प्रेयसीला दगडाने ठेचून स्वत:चा गळा चिरला; मुलीचा जागीच मृत्यू, युवक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 17:39 IST

संतापलेल्या शुभमने आपल्याच प्रेयसीचा अतिशय निर्दयीपणे दगडाने ठेचून खून केला. ती ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर शुभमने ब्लेडने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापली व नंतर स्वत:चा गळा ब्लेडने चिरला.

ठळक मुद्देलोहारा एमआयडीसीतील घटना

यवतमाळ : शहरातील दारव्हा मार्गावरील लोहारा एमआयडीसी परिसर प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. पॉवर हाऊसमागील भागात एक युवक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर तडफडताना दिसला. याची माहिती लोहारा पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठले असता त्या युवकाने स्वत:च्या प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केल्याचे सांगितले व नंतर तो बेशुद्ध झाला. त्याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही थरारक घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजता दरम्यान घडली.

आस्था सुरेश तुंबडे (१८) रा. गुरुकृपा सोसायटी जुना उमरसरा असे मृत मुलीचे नाव आहे. तर शुभम अशोक बकाल (२३) रा. शिंदेनगर असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. शुभम हा वडिलाची दुचाकी एमएच-२९-बीएम-३१४६ हिने लोहारा एमआयडीसी परिसरात पोहोचला. त्याने सोबत आस्थाला घेतले. दरम्यान, या झुडपी वजा जंगलात दोघांमध्ये नेमका कशावरुन वाद झाला, हे स्पष्ट नाही. या वादात संतापलेल्या शुभमने आपल्याच प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केला. त्याने अतिशय निर्दयीपणे आस्थाच्या चेहऱ्यावर दगडाने घाव घातले. ती ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर शुभमने ब्लेडने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापली. नंतर स्वत:चा गळा ब्लेडने चिरला. 

रक्ताच्या थारोळ्यात तडफडत शुभम झुडूपी वजा जंगलातून मुख्य रस्त्यावर आला. तेथे तो योगेश यादव नामक व्यक्तीला दिसला. योगेशने तत्काळ याची माहिती लोहारा ठाणेदार दीपमाला भेंडे यांना दिली. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी शुभमला तातडीने शासकीय रुग्णालयात हलविले. तर आस्था ही जागेवरच गतप्राण झाल्याचे आढळून आले.

सुरुवातीला प्रेमीयुगुलावर कुणी हल्ला तर केला नाही ना, अशी शंका व्यक्त होत होती. मात्र परिसरातच आरोपी शुभमची दुचाकी आढळून आली. शिवाय आस्थाच्या जवळ तिच्या शाळेची बॅग व इतर कागदपत्रही त्यात आढळून आले. यावरून दोघांची काही तासाच ओळख पटली. त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली.

या प्रकरणी आस्थाचे वडील सुरेश तुंबडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शुभम विरोधात कलम ३०२, ३०९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लोहारा पोलीस ठाण्यात सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळPoliceपोलिस