लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : २५ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने भोसकून खून करण्यात आला. गुरुवारी सकाळी शहरात ही घटना उघडकीस आली. मनोज विश्वनाथ वाठोरे असे मृताचे नाव असून तो प्रभाग १० मधील फुकटनगरातील रहिवासी होता.मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना सकाळी स्मशानभूमीजवळ पूस नदी काठावर तरुणाचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच ठाणेदार दामोधर राठोड, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मनोजच्या पोटावर, छातीवर दहा घाव घालण्यात आले होते. परंतु घटनास्थळी रक्त न दिसल्याने इतर ठिकाणी काटा काढून मृतदेह नदी काठावर आणून टाकल्याचा संशय आहे. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास हा खून झाल्याची शक्यता आहे.दरम्यान एलसीबी पथकानेही घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. मृताच्या घरी जाऊन चाचपणी करण्यात आली. मृतक मनोजची आई उषा विश्वनाथ वाठोरे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.रेती उपसणाऱ्यांची ठाण्यात झाडाझडतीमनोज वाठोरे याचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला. शहरातील एका कापड केंद्रात तो नोकरी करीत होता. या खुनाच्या तपासासाठी यवतमाळ येथून श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. खुनाच्या आदल्या रात्री मनोज सोबत काही जण होते, अशी गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले. शिवाय पूस नदी पात्रातून अवैध रेती उपसा करणाºयांचीही ठाण्यात झाडाझडती घेण्यात आली.
महागावात तरुणाचा भोसकून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना सकाळी स्मशानभूमीजवळ पूस नदी काठावर तरुणाचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच ठाणेदार दामोधर राठोड, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मनोजच्या पोटावर, छातीवर दहा घाव घालण्यात आले होते. परंतु घटनास्थळी रक्त न दिसल्याने इतर ठिकाणी काटा काढून मृतदेह नदी काठावर आणून टाकल्याचा संशय आहे.
महागावात तरुणाचा भोसकून खून
ठळक मुद्देतीक्ष्ण शस्त्राचा वापर : पोटावर, छातीवर तब्बल दहा घाव