शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात कोंबडबाजार बहरला, दररोज लाखोंची उलाढाल, गोरगरीब शेतक-यांचे खिसे होताहेत रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 18:22 IST

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी आणि पांढरकवडा उपविभागात अनेक ठिकाणी कोंबडबाजार बहरला आहे. कोंबड्याच्या झुंजीवर पैसा लावण्याच्या या खेळात दररोज प्रत्येक ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत आहेत. पोलिसांच्या संरक्षणात हा कोंबडबाजार सुरू आहे, हे विशेष. 

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या वणी आणि पांढरकवडा उपविभागात अनेक ठिकाणी कोंबडबाजार बहरला आहे. कोंबड्याच्या झुंजीवर पैसा लावण्याच्या या खेळात दररोज प्रत्येक ठिकाणी लाखो रुपयांची उलाढाल होत आहेत. पोलिसांच्या संरक्षणात हा कोंबडबाजार सुरू आहे, हे विशेष. वणी उपविभागातील पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुर्दापूर येथे आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर नुकतीच पोलिसांनी धाड घातली. तेथून ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तेलंगणा-आंध्रप्रदेशातील २३ प्रतिष्ठीत जुगा-यांना अटक करण्यात आली. वणी एसडीपीओंच्या हद्दीतील या जुगारावर पांढरकवड्याच्या एसडीपीओंनी धाड घातली, हे विशेष. या धाडीच्या निमित्ताने वणी व पांढरकवडा उपविभागातील इतरही अवैध व्यवसायांची आता चर्चा होऊ लागली आहे. आंतरराज्यीय सीमेवरून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर अंमली पदार्थ, जनावरे, प्रतिबंधित गुटखा, तेलंगणातील एक रुपया किलोने मिळणारा तांदूळ, चांदी याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. त्यातच आता कोंबडबाजारही चर्चेत आले आहेत. वणी व पांढरकवडा या दोनही उपविभागात डझनावर कोंबडबाजार आहेत. त्यातील मंदर, कुंभा, कोलारपिंपरी, मोरदवाकोडी, घाटंजी तालुक्यातील चोरंबा अशा काही कोंबडबाजारांवर सर्वाधिक उलाढाल होत असल्याचे सांगितले जाते. चोरंबाचा कोंबडबाजार तर जणू वर्षभर चालतो. मारेगाव, वणी, शिरपूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रमुख कोंबडबाजार आहेत. तेथे दारू, जुगार व खानपानाची सर्वच व्यवस्था उपलब्ध असते. तेथे एका-एका कोंबड्यावर पाच ते दहा लाखांची बोली लावली जाते. तेलंगणा-आंध्रप्रदेशातील शौकीन या कोंबडबाजारावर खेळण्यासाठी येतात. सुर्दापूर येथील आंतरराज्यीय जुगार अड्ड्यावर पडलेल्या धाडीने ही बाब सिद्धच केली आहे. पोलीस चौकी, ठाणे एवढेच नव्हे तर उपविभागीय पोलीस कार्यालयांचेसुद्धा या तमाम अवैध धंद्यांना अभय राहत असल्याचे सांगितले जाते. पोलिसांच्या संरक्षणाशिवाय हे अवैध धंदे चालू शकत नाही, हीबाब सर्वश्रृत आहे. या धंद्यांवरून वसुलीसाठी पोलीस अधिका-यांनी आपले मर्जीतील ‘खास’ कर्मचारी नेमले आहेत. या धंद्यातील लाभाचे संबंधित सर्वच वाटेकरी आहेत. शेतक-यांच्या घरात पीक आल्यानंतर ऐन हिवाळ्यात हे कोंबडबाजार अधिक बहरतात. शेतमाल विकून आलेल्या शेतक-यांना हेरले जाते, दारू पाजून त्यांचे खिसे कोंबडबाजारात रिकामे केले जातात. यासाठी कोंबडबाजारच्या संचालकांकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाहेर माल विकून आलेल्या शेतक-यांना हेरण्यासाठी खास दलाल नेमलेले असतात. वणी, पांढरकवडा उपविभागातील हे कोंबडबाजार जिल्ह्यातील शेतक-यांच्या हक्कासाठी लढणारे राजकारणी, स्वयंसेवी संस्था आणि यवतमाळ किंवा अमरावतीच नव्हे तर मुंबईपर्यंतच्या पोलीस प्रशासनासाठी आव्हान ठरले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र