लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: नेर येथील नवीन बसस्थानाकावरील दीपक तेल भंडार हे दुकान चोरांनी फोडून ६६ हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यावेळी चौकीदारालाही मारहाण झाल्याचे समोर आले.नेर येथे अमरावती रोडवर शेखर मालानी यांचे दीपक तेल भंडार हे दुकान आहे. काल रात्री अज्ञात चोरांनी येथे चोरी केली. या दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याचेही लक्षात आले. दुकानाचे शटर वाकवून आतमध्ये चोरांनी प्रवेश केला. काऊंटरमधील ६६ हजार चोरले व येथील चौकीदाराला मारहाण केली. यापूर्वीही नेर येथे समीर किराणा स्टोअर अशाच पद्धतीने फोडले होते. या चोरीमुळे नेर तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे. सीसीटीव्हीत यापूर्वीही चोरटे दिसून आले आहेत.
यवमताळ जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरा फोडून दुकानातून ६६ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 09:06 IST