शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
4
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
5
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
6
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
7
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
8
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
9
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
10
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
11
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
12
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
13
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
14
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
15
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
16
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
17
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
18
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
19
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
20
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."

यवतमाळच्या तरुण संगीतकाराची सिनेजगतात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 11:35 IST

मुंबईच्या मायानगरीपासून दूर असलेल्या यवतमाळनगरीतही कलावंतांची खाण आहे. येथील एका कलासक्त तरुणाने ख्यातनाम संगीतकार ए.आर.रहमान यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आणि बिगबजेट मराठी सिनेमाला पार्श्वसंगीतही दिले आहे.

ठळक मुद्देए.आर.रहमानकडे प्रशिक्षण, आता बिगबजेट सिनेमाला संगीत

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुंबईच्या मायानगरीपासून दूर असलेल्या यवतमाळनगरीतही कलावंतांची खाण आहे. येथील एका कलासक्त तरुणाने ख्यातनाम संगीतकार ए.आर.रहमान यांच्याकडे प्रशिक्षण घेतले आणि आतातर थेट बिगबजेट मराठी सिनेमाला पार्श्वसंगीतही दिले. शान, जावेदअली, सुखविंदरसिंगसारख्या आघाडीच्या गायकांनी त्याच्या संगीतदिग्दर्शनात गायन केले आहे. अजिंक्य किशोर सोनटक्के असे या वयाने कोवळ्या आणि मेहनतीने परिपक्व तरुणाचे नाव आहे.सिनेजगतात संगीत दिग्दर्शक बनलेला अजिंक्य केवळ २५ वर्षांचा आहे. नदिम शेख हे एस.आय.प्रोडक्शन अंतर्गत बनवत असलेल्या मराठी चित्रपटासाठी अजिंक्यचे संगीत आहे. त्यात एकंदर पाच गाणी असून यातील चार गाण्यांचे रेकॉर्डिंग शान आणि जावेद अली यांच्या आवाजात पूर्ण झाले आहे. तर लवकरच पाचवे गाणे सुखविंदर सिंग गाणार आहेत. शिवाय, शान यांच्यासोबत अनिशा सैकियानेही एक गाणे गायिले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन फिरोजखान करीत असून कोरिओग्राफर गणेश आचार्य आहेत. तर गीतकार यवतमाळचेच पद्माकर मलकापुरे आहेत.शान आणि जावेदअली यांनीही अजिंक्यच्या संगीत रचनांची तसेच संगीत संयोजनाचे कौतुक केले. विशेष म्हणजे, रेकॉर्डिंग स्टुडिओचे ठरलेले भाडेही न घेता त्यांनी अजिंक्यला शाबासकी दिली.यवतमाळच्या अकादमीची बॉलिवूडला देणतरुण संगीतकार अजिंक्य सोनटक्के हा यवतमाळ येथील नटराज संगीत कलाअकादमीचे संचालक डॉ. किशोर सोनटक्के यांचा मुलगा आहे. वडिलांचे संस्कार त्याला मिळाले आहेत. त्याने वयाच्या चौथ्या वर्षीच स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर बाराव्या वर्षी संगीतकार कल्याणजी आनंदजी प्रस्तुत लिटील स्टार ग्रुपमध्ये आॅक्टोपॅड व गिटार वादन केले. पुढील तीन वर्षे जगविख्यात संगीतकार ए.आर.रहमान यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. तेथे पियानो, साउंड इंजिनिअरिंग, म्युझिक प्रॉडक्शन, स्टाफ नोटेशनचे धडे गिरविले. लंडन युनिव्हर्सिटीतून पियानोवादनात अजिंक्य मेरिट आला. साउंट इंजिनिअरिंगमध्येही ‘टॉप’ केले. पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या यवतमाळच्या अकादमीचा हा कलावंत आता बॉलीवूड पादाक्रांत करण्याकडे सुरू झाला आहे.‘जिंदगी’ला ८ तासात दीड लाखांची पसंतीकाही दिवसापूर्वीच अंजिक्यचे संगीत असलेल्या ‘जिंदगी’ या रॅपसाँगला इन्स्टाग्रामवर ८ तासात १ लाख ४९ हजार लोकांनी पाहिले. तर आता ४ लाख १७ हजार लोकांनी पसंती दिली. आतापर्यंत अजिंक्यने १५ हिंदी, ४ गुजराती, तर ५ पंजाबी चित्रपटांना संगीत दिले आहे. सध्या तो अमर मोहीले यांच्यासोबत पार्श्वसंगीताचे काम करतो. २०१५ मध्ये नोकिया कंपनीसाठी त्याने दोन रिंगटोनही केल्या. टाईम्स म्युझिकनिर्मित आणि सोनू निगम यांनी गायन केलेल्या अल्बमलाही अजिंक्यने संगीत दिले आहे.शान यांनी गायलेल्या दोन गाण्यांपैकी एक ड्रिम साँग तर दुसरे डान्स लव साँग आहे. जावेद अलींच्या दोन गाण्यांपैकी एक सॅड साँग आहे. तर दुसरी मराठी कव्वाली आहे. बॉलीवूडमधील या आघाडीच्या गायकांसोबत काम करताना वेगळा अनुभव मिळाला.- अजिंक्य किशोर सोनटक्के, संगीतकार, यवतमाळ

टॅग्स :musicसंगीत