लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील सध्याचे बसस्थानक जमीनदोस्त करून त्या ठिकाणी ‘कार्पोरेट लूक’ असलेले बसस्थानक उभारले जाणार आहे. त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरच काम सुरु होणार आहे. तसेच नवीन ५० शिवशाही बसेस यवतमाळच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.राज्य परिवहन महामंडळ राज्यभरातील विविध बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलविणार आहे. त्यासाठी तीन प्रकारच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जुने बसस्थानक पाडणे, नवीन उभारणे, सध्याच्या बसस्थानकाची डागडुजी व रंग रंगोटी करणे अशा पद्धतीने कामे केली जाणार आहे.यामध्ये यवतमाळच्या बसस्थानक इमारतीला अनेक वर्ष झाल्याने ही इमारत पाडून नवे बसस्थानक उभारले जाणार आहे. यवतमाळच्या बसस्थानकासाठी २० कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. परिवहन महामंडळात दोन हजार शिवशाही बसेस नव्याने दाखल होणार असून यातील ५० बसेस यवतमाळात येणार आहे. उत्पन्न वाढीसाठी नव्या बसफेऱ्या, थांबे वाढविले जाणार आहे. पत्रकार परिषदेला यवतमाळात नव्यानेच रुजू झालेले विभागीय नियंत्रक विनय गव्हाळे, अविनाश राजगुरे, एस.डी. नाटकर, प्रताप राठोड, वसंत टेकाम, अनंत ताठर, दिप्ती वड्डे, सोनाली लडके, हेमंत चांदूरकर, अभिजित कोरटकर, रमेश उईके आदी आगार प्रमुख उपस्थित होते.दरवाढीचे महामंडळाला स्वातंत्र्यतिकीटांचे दर वाढविण्यासाठी महामंडळाला पूर्वी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागत होती. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहे. त्यामुळे तिकीट दर वाढविण्यासाठी महामंडळाला स्वतंत्र सूत्र ठरवून देण्यात आले आहे. या सूत्रानुसार तिकीट आकारण्याचे स्वतंत्र महामंडळाला मिळाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यवतमाळचे हायटेक बसस्थानक २० कोटींचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:47 IST
येथील सध्याचे बसस्थानक जमीनदोस्त करून त्या ठिकाणी ‘कार्पोरेट लूक’ असलेले बसस्थानक उभारले जाणार आहे. त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरच काम सुरु होणार आहे. तसेच नवीन ५० शिवशाही बसेस यवतमाळच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यवतमाळचे हायटेक बसस्थानक २० कोटींचे
ठळक मुद्देनवनिर्मिती : तीन माळ्यांची इमारत, ५० शिवशाही बसेस