शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

यूपीएससीतील यशात आई-वडिलांच्या कष्टाचा मोठा वाटा- गिरीश बदोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 21:57 IST

उस्मानाबादचा गिरीश बदोले राज्यात पहिला

उस्मानाबाद : कष्टकरी आई-वडिलांच्या प्रेरणेमुळेच यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याची भावना गिरीश बदोलेनं व्यक्त केली. गिरीश बदोले यूपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आहे. गिरीशच्या या नेत्रदीपक यशामुळे दोन एकर कोरडवाहू शेती असलेल्या बदोले कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.  लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत उस्मानाबाद जिल्ह्यातील कसगी गावचा गिरीश बदोले राज्यात पहिला आलाय. या उत्तुंग यशात आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याची भावना गिरीशनं व्यक्त केली. कसगी गावात बदोले यांची कोरडवाहू शेतजमीन आहे. याशिवाय त्यांचं कुटुंब इतरांची जमीनही कसायला घेतं. 'अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही आई-वडिलांनी मोठं पाठबळ दिलं,' असं गिरीशनं सांगितलं. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी जितका अभ्यास महत्वाचा असतो, तितकंच वृत्तपत्रांचं वाचनही महत्वाचं असतं. माझ्या यशात वृत्तपत्रांचाही मोठा वाटा आहे, असं गिरीशनं म्हटलं. गिरीशचं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण तुळजापूरच्या सैनिकी विद्यालयातून झालं. त्यानंतर लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून त्यानं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे मुंबईच्या जे.जे. मधून एमबीबीएसची पदवी मिळविली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं, तरी प्रशासकीय अधिकारी होण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती, असं गिरीशनं 'लोकमत'शी बोलताना सांगितलं. अधिकारी होण्याची इच्छा आणि आई, वडिलांचं भक्कम पाठबळ मिळाल्यानंतर गिरीशनं २०१४ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणं सुरू केलं. अखेर चौथ्या प्रयत्नात त्याला घवघवीत यश मिळालं. या यशाबद्दल बोलताना तो म्हणाला, 'दिवसातील १२ ते १५ तास अभ्यासाला द्यायचो. एकच लक्ष्य नजरेसमोर ठेवून पुण्यात तयारी सुरू केली. सुरुवातीला अपयश आलं. पण खचलो नाही. पुन्हा जोमानं प्रयत्न केले,' असं गिरीशनं सांगितलं.  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगYavatmalयवतमाळ